प्रिया बापटने केला लाडू बनवतानाचा व्हिडिओ शेअर; ‘हा’ कलाकार म्हणाला, ‘मला पण पाहिजे’


सण म्हंटल की, गोडधोड, वेग-वेगळ्या पदार्थांची घरात मेजवानी असते. सध्या गणपतीचा सण चालू आहे. सर्वत्र आनंदी- आनंद आहे. चित्रपटसृष्टीमधून देखील अनेक मेजवान्या बघायला मिळत आहे. अशातच मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने बेसनाचे लाडू बनवताना व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियाने साधी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तसेच केस मागे बांधून गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. या व्हिडिओमध्ये ती अगदी एक गृहिणी दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती बेसनाचे लाडू वळताना दिसत आहे. तसेच लाडू पूर्ण झालेले देखील दिसत आहे. या व्हिडिओच्या‌ बॅकग्राऊंडला इंस्टाग्रामवरील एक ट्रेंडिंग म्युझिक लागले आहे. (Marathi actress priya bapat share a ladu making video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “जब मन में लड्डू फुटा.” तिच्या या व्हिडिओवर तिचे अनेक चाहते आणि कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या व्हिडिओवर अमृता खानविलकर, अनु प्रिया, आदित्य सरपोतदार, सोनू लखवानी त्यांनी कमेंट केल्या आहेत. सोनू लखवानी याने “मला पण पाहिजे,” अशी कमेंट केली आहे. यावर प्रिया बापटने “इकडे ये,” असा रिप्लाय दिला आहे.

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाईमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लीज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच उमेशने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आली गौराई अंगणी…’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री समिधाने सुंदर फोटो केले शेअर; एकदा पाहाच

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत


Leave A Reply

Your email address will not be published.