Video: बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ पुण्यात, सिम्बायोसिस कॉलेजमध्ये जाऊन कार्तिकने केला चाहत्याच्या मैत्रिणीला प्रँक कॉल


अनेकदा बॉलिवूड कलाकार त्यांच्या चाहत्यांना भेटल्यानंतर इतके आनंदी होतात की, ते मस्ती आणि विनोदात मग्न होतात. असाच काहीसा प्रकार अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत घडला. तो नुकताच पुण्यातील एका कॉलेजमध्ये पोहोचला. अभिनेत्याला पाहताच त्याच्या चाहत्यांनी त्याला घेरले. यानंतर कार्तिकने त्याच्या एका चाहत्याच्या मैत्रिणीला फोन केला आणि त्याच्याशी मित्र म्हणून बोलू लागला. जेव्हा चाहत्याच्या मैत्रिणीला कळले की, तो त्याच्या मित्राशी नाही, तर तो कार्तिक त्याच्याशी बोलत आहे. चला तर मग पुढे काय झाले ते जाणून घेऊया…

चाहत्यांच्या फोनवरून त्यांच्या मित्रांना केला फोन
बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ कार्तिक (Kartik Aaryan) चाहत्यांशी नेहमी चांगलाच बोलतो. अनेकवेळा तो त्याच्या चाहत्यांशी इतका विनोद करायला लागतो की, त्याचे चाहतेही त्याला पाहून थक्क होतात. नुकताच कार्तिकचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. इथे पोहोचताच कार्तिकने त्याच्या चाहत्यांच्या मित्रांना फोन करायला सुरुवात केली.

मैत्रिणीसोबत केला प्रँक
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, कार्तिकचे चाहते त्याच्याभोवती आहेत. कार्तिक एका मुलीशी फोनवर यश म्हणून बोलत आहे. यश हा कार्तिकचा चाहता आहे, जो त्याच्या शेजारी उभा आहे. कार्तिक यशच्या मैत्रिणीला कॉल करतो आणि त्याची खिल्ली उडवतो. कार्तिक यशच्या मैत्रिणीशी यश म्हणून बोलतो, तेवढ्यात मागून एकजण कार्तिक असल्याचे सांगतो. फोनवर मुलगी कार्तिकचे नाव घेऊन आनंदाने ओरडू लागते. यानंतर कार्तिक देखील हसू लागतो, तेव्हाच मधूनच एकजण बोलते, आता प्रपोज कर. त्यानंतर कार्तिक यशला फोन देतो.

फनी प्रँक कॉलचा व्हिडिओ होत आहे व्हायरल
कार्तिक आर्यनचा हा प्रँक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”कार्तिक आर्यनने त्याच्या फॅनच्या मैत्रिणीला एक मजेदार प्रँक कॉल केला. जेव्हा तो सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शूटिंग करत होता.”

या व्हिडिओला आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहते या व्हिडिओला प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!