Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी मुलीला इम्प्रेस करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारने धरला वांगी विकण्याचा मार्ग, व्हिडिओला एकाच दिवसात ‘एवढे’ हिट्स

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारने धरला वांगी विकण्याचा मार्ग, व्हिडिओला एकाच दिवसात ‘एवढे’ हिट्स

भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते आणि गायक आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच शानदार गाणे घेऊन येत असतात. यामध्ये खेसारी लाल यादव याचादेखील समावेश आहे. मात्र, युट्यूबवर व्हायरल होणाऱ्या एका गाण्यात तो चक्क मुलीला इम्प्रेस करण्याच्या नादात वांगे विकताना दिसत आहे. मात्र, हे खरे नसून खोटे आहे. अभिनेत्याचे एक गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याच्या नवीन गाण्याचे नाव ‘बैगन लेला’ (Baigan Lela) असे आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता एकदम गरीब आणि देशी अंदाजात दिसत आहे. तसेच, तो वांगी विकत आहे. यामधील त्याचा अंदाज चाहत्यांना खूपच आवडत आहे. तो व्हिडिओत ‘बैगन लेला’ असे म्हणत जोरजोरात ओरडत आहे. गाण्यात दिसणारा खेसारीलालचा हा विचित्र अंदाज काही नवीन नाहीये. यापूर्वीही तो आपल्या नवरीला डोक्यावर घेऊन चालताना दिसला आहे आणि आता तो वांगी विकण्यासाठी निघाला आहे.

या गाण्याचा व्हिडिओ आदिशक्ती फिल्म्स (Aadishakti Films) या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला युट्यूबवर २४ तासातच जवळपास १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त व्हिडिओवर १ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. हा व्हिडिओ चाहते व्हायरल करत आहेत.

खेसारी लाल यादव आणि अंतरा सिंग प्रियांका यांनी हे गाणे गायले आहे. दोघांनीही अप्रतिमरीत्या या गाण्याला आपला आवाज दिला आहे. पुन्हा एकदा खेसारीच्या आवाजाचा जादू प्रेक्षकांवर दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, ‘बैगन लेला’ हे गाणे युट्यूबलर १ कोटी व्ह्यूजचा आकडाही लवकरच पार करेल. या गाण्याला श्यामसुंदर देहाती यांनी संगीत दिले आहे आणि या गाण्याचे गीत पवन पांडे यांनी लिहिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, गाण्यात दिसणारी अभिनेत्री ही प्रीती राज आहे. तसेच, व्हिडिओ दिग्दर्शक सुशांत सिंग आणि कुमार चंदन आहेत. तसेच, क्रिएटिव्ह दिग्दर्शक पंकज सोनी आणि निर्माते मनोज मिश्रा हे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा