दिवसाढवळ्या ‘ये हैं चाहते’ फेम अभिनेत्यासोबत घडली चोरीची घटना; कारमधून लॅपटॉप लंपास


सामान्य लोकांसोबत अनेकदा लुटमारीच्या घटना घडतच असतात. या घटनांमधून कलाकार देखील वाचले नाहीये. अनेक कलाकारांसोबत लुटीच्या, फसवण्याच्या घटना घडल्याचे आपण अनेकदा ऐकले, वाचले असेल. मात्र, मुंबईच्या जुहू सारख्या पॉश भागात, दिवसाढवळ्या कलाकारांसोबत अशी घटना झाली, तर नक्कीच आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

अशीच एक घटना नुकतीच एका टीव्ही अभिनेत्यासोबत घडली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं चाहते’मध्ये काम करणाऱ्या अभिनेता खुशांक अरोराच्या कारमधून दिवसा चोरी झाली आहे. मुंबईमधील जुहू येथे ही चोरीची घटना घडली.

माध्यमातील वृत्तानुसार, खुशांक त्याच्या आगामी प्रोजक्टच्या मीटिंगसाठी जुहू येथे गेला होता. तेथे त्याने एका ठिकाणी पार्किंग एरियामध्ये कार पार्क केली होती, आणि तो मीटिंगसाठी गेला. जवळपास एका तासानंतर मीटिंग संपवून जेव्हा तो परत आला, तेव्हा त्याला कारची मागची खिडकी तुटलेली दिसली. त्यानंतर खुशांकने कारमध्ये ठेवलेला त्याचा लॅपटॉप आहे की नाही हे तपासले, तेव्हा चोरांनी कारची काच तोडून लॅपटॉप चोरी झाल्याचे समजले.

या चोरीबद्दल सांगताना खुशांक म्हणाला, “मी जुहूमध्ये माझी मीटिंग संपवून साधारण तासाभराने माझ्या गाडीजवळ आल्यावर मला माझ्या गाडीची मागची काच तुटलेली दिसली, गाडीच्या मागच्या सीटवर माझा Dell XPS लॅपटॉप होता, ज्याची किंमत जवळपास पन्नास हजार इतकी होती. तो चोरीला गेला आहे. माझ्या लॅपटॉपमध्ये खूप महत्वाचा डेटा होता. मला ही मीटिंग झाल्यावर पुढे लोखंडवाला येथे SAME PLACE SAME TIME जायचे होते. पुढच्या महिन्यापासून रेस्टॉरंट सुरू होणार असल्याने मला टीमसोबत चर्चा करायची होती. या प्रकरणी सध्या पोलीस चौकशी करत आहेत. सायबर पोलीस देखील या लॅपटॉपचा आयपी अड्रेस ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

तत्पूर्वी खुशांकने ‘ये हैं चाहते’ या मालिकेत नकारात्मक भूमिका बजावत जबरदस्त अभिनय केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.