Friday, May 24, 2024

‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्याची अलिबाग पोलिसात धाव, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

टिव्हीवरील ‘शाका लाका बूम बूम’ ही एक फेमस मालिका आहे. या मलिकेने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. या मालिकेतील अनेक पात्रांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेमध्ये संजूची भूमिका करून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे किंशूक वैद्य होय. त्याने कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. सध्य अभिनेता किंशूक वैद्य विषयी मोठी बातमी समोर आली आहे.

किंशुक वैद्य ( Kinshuk Vaidya) बऱ्याच दिवसांपासून अडचणीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अलिबागमधील काही स्थानिकांकडून त्याचा छळ होत असल्याचे किंशुक म्हणणे आहे. याप्रकरणी किंशुकने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किंशुक याने अलिबाग पोलिस ठाण्यात नागावच्या सरपंचाविरुद्ध जमीन मालक आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या गेटचे नुकसान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

किंशुक वैद्य म्हणाला की, “नागावमध्ये माझी वडिलोपार्जित मालमत्ता आहे. डिसेंबर 2022 मध्ये मी तिचे रिसॉर्ट बनवल आहे. गेल्या काही महिन्यांपासून मला नागाव, अलिबाग येथील स्थानिकांकडून त्रास दिला जात आहे. सकाळी नागावचे सरपंच निखिल मयेकर यांनी जमिनीचा मालक असलेल्या त्यांच्या मित्राला व ऑपरेटरला माझे कर्मचारी गेट तोडण्यास सांगिले. किंशुक वैद्यने सांगितले की, त्याच्याकडे त्याचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग देखील आहे. त्यानंतर त्याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला आणि ठाण्यात पुरावे सादर केले.

तसेच पुढे बोलताना किंशुक म्हणाला की, “जवळच्या परिसरात राहणारे स्थानिक लोक रुंद रस्त्याची मागणी करत आहेत, जो माझ्या मालमत्तेच्या भागात बांधला जावा. पण हे शक्य नाही. माझा देशाच्या कायदा आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हे सर्व लवकर थांबावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलच गाजत आहे. (Actor Kinshuk Vaidya of ‘Shaka Laka Boom Boom’ fame ran to the Alibaug police)

अधिक वाचा- 
पहिला पाऊस पडताच अभिनेता कुशल बद्रिके झाला रोमँटिक; म्हणाला, ‘तुझ्या आठवांसारखा..’
बिग बॉसच्या घरातून ‘ही’ स्पर्धक पडली बाहेर? एलिमिनेशननंतर अभिनेत्री झाली भावूक 

हे देखील वाचा