Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन बिग बॉसच्या घरातून ‘ही’ स्पर्धक पडली बाहेर? एलिमिनेशननंतर अभिनेत्री झाली भावूक

बिग बॉसच्या घरातून ‘ही’ स्पर्धक पडली बाहेर? एलिमिनेशननंतर अभिनेत्री झाली भावूक

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बाॅस ओटीटी 2’चा सिझन चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच हा शो सुरू होऊन एक आठवडा पुर्ण झाला आहे. या शोमध्ये मोठी धमाल पाहायला मिळत आहे. हा शो पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. सोशल मीडिया स्टार्सपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत अनेकजण या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या आठवड्यात पुनीत सुपरस्टारनंतर पलक पुरसवानी कमीत कमी मतांमुळे घरातून बाहेर काढण्यात आले आहे.

‘बिग बाॅस‘च्या (bigg boss ott 2) घरातील सदस्यांनी निर्मात्यांना मसाला लावण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या आठवड्यात बेदखल करण्यासाठी 4 जणांचे नामांकन करण्यात आले होते. ज्यामध्ये बाबिका ध्रुवे, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि पलक पुरसवानी यांच्या नावाचा समावेश होता. शनिवारी (24 जून) वीकेंड का वार झाला. यामध्ये सलमानने आकांक्षा पुरीपासून ते आलिया सिद्दीकीपर्यंत सर्वांना फटकारले.

यावेळी ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये कोणीचीही हकालपट्टी होणार नाही, असे सर्वांना वाटत होते. कारण शोच्या सुरुवातीलाच पुनीत सुपरस्टारला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे सर्वजण निवांत होते. पण आता पलक पुरसवानी बेघर झाल्याची बातमी समोर आली आहे. पलक पुरसवानी शोच्या पहिल्याच आठवड्यात बाहेर पडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

पलक पुरसवानी ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक शोमध्ये काम केले आहे. या शोमध्ये यायच आणि जिंकायच हे तिच खूप दिवसांच स्वप्न होत. तिने अनेक वेळा निर्मात्यांशी संपर्क साधला होता. पण त्यांनी नकार दिला होता. बिग बॉसमधून तिला ही संधी मिळाली हे खरे आहे, पण स्वत:ला सिद्ध करण्यात ती कुठेतरी चुकली. त्यामुळे लोकांच्या कमी मतांमुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आले. एलिमिनेशनची बातमी ऐकून पलक दुखावली गेली आणि तिने सगळ्यांचा निरोप घेतला. शोमध्ये येण्याची एवढी मोठी संधी दिल्याबद्दल तिने ‘बिग बॉस’चे आभारही मानले. (television bigg boss ott 2 house weekend ka war salman khan eliminated actress palak purswani from the house now details)

अधिक वाचा- 
जुळ्या मुलांची नाव ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार शाहरूखची फॅन; अभिनेता म्हणाला,’ प्लिज त्यांना आणखी..’
सावत्र आई श्रीदेवींसोबत असे होते नाते, तर सलमानला मानतो आदर्श; जाणून घ्या अर्जुन कपूरबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा