Friday, May 24, 2024

पहिला पाऊस पडताच अभिनेता कुशल बद्रिके झाला रोमँटिक; म्हणाला, ‘तुझ्या आठवांसारखा..’

‘चला हवा येऊ द्या‘च्या मंचावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणारा प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. विनोद विश्वात आपल्या अनोख्या स्टाइलने प्रचंड नाव कमावणाऱ्या कुशलचे लाखो खूप चाहते आहेत. कुशल हा गेली अनेक वर्षे त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे. विनोदाचा बादशाह आणि हुकमी एक्का म्हणून सर्वत्र कुशलला ओळखले जाते.

कुशलच्या (Kushal Badrike) कामाचे नेहमीच तोंडभरून कौतुक केले जाते. त्याच्या विनोदाला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. पहिल्यादांच विनोदाच्या भूमिकेत दिसणारा कुशल रोमँटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनच आगमन झाले आहे. पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्या पावसावर कुशलने रोमँटिक अंदाजात भन्नाट पोस्ट लिहिली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कुशलच्या या पोस्टने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पोस्ट करताना कुशलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी, कोसळू देतो “त्याला” तुझ्या आठवांसारखा. मात्र मनमोकळा श्वास घेतो भिजल्या मातीचा तुझ्या केसांसारखा…” तसेच त्याने एक फोटो शेअर केला आहे. कुशलच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “क्या बात है! मला वाटल नव्हत कि तू इतका छान लिहितोस.” दुसऱ्या एकाने लिहिले की,”भावा…आपले आधीचे दिवस आठवले… बिल्डिंग अणि चहा.” तर इतर एकाने लिहिले की, “मेंशन करत नाहीस. पण घरी गेलास कि ऊन वारा पाऊस सगळे एकदाच दिसेल.” असे लिहित युजरने कुशलची खिल्ली उडवली आहे. (television chala hawa yeu dya fame kushal badrike share romantic post in monsoon easons)

अधिक वाचा- 
बिग बॉसच्या घरातून ‘ही’ स्पर्धक पडली बाहेर? एलिमिनेशननंतर अभिनेत्री झाली भावूक
जुळ्या मुलांची नाव ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार शाहरूखची फॅन; अभिनेता म्हणाला,’ प्लिज त्यांना आणखी..’ 

हे देखील वाचा