मागील एक वर्षात एका मालिकेने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस’ (Devmanus) होय. कदाचित मराठीमधील ही अशी पहिलीच मालिका असेल ज्यातील मुख्य भूमिका नकारात्मक होती. आतापर्यंत क्राईम मालिकांमध्ये या मालिकेने टीआरपीच्या यादीत उच्चांक गाठला आहे. मालिकेत किरण गायकवाड (Kiran Gaikwad) हा मुख्य आणि खलनायकाच्या भूमिकेत होता. या मालिकेने ऑगस्ट महिन्यात सगळ्यांचा निरोप घेतला. मालिकेचा शेवट काही असा झाला की, ज्यामुळे सगळेच प्रेक्षक संभ्रमात होते.
या मालिकेच्या प्रोमोपासूनच सगळ्यांनी मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. एक आगळी वेगळी कहाणी, मालिकेतील पात्र, डायलॉग, त्यांची भाषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खास करून भावल्या. तसेच किरण गायकवाड नकारात्मक भूमिकेत असूनही त्याचा कोणी राग केला नाही, तर त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुकच होत होते. मालिकेचा शेवट अनुत्तरित राहिल्याने मालिकेचा पुढचा भाग येईल याची सगळ्यांना आशा होती. अशातच काही दिवसांपूर्वी ‘देवमाणूस २’ येणार आहे अशी घोषणा झाली करण्यात आली आहे. (Actor kiran dange will not be part of devmanus season 2)
मालिकेचे प्रोमो समोर आले आहेत परंतु अजून एकही कलाकाराचा चेहरा समोर आला नाही. त्यामुळे आता या पर्वात जुनेच कलाकार दिसणार आहेत की, आणखी कोणी दिसणार आहेत? याबाबत प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘देवमाणूस’ मधील अजितकुमार देव, सरू आजी, टोण्या, डिंपल, बज्या, नाम्या या पात्रांना विशेष प्रेम मिळाले होते. त्यामुळे आता या पर्वात त्यांना पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, यातील बज्या हे पात्र साकारणारा अभिनेता किरण डांगे आता ‘देवमाणूस’ मालिकेत दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे. किरण सध्या ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेत भूमिका साकारतोय. त्यामुळे तो ‘देवमाणूस’मध्ये दिसणार की नाही? हे अद्यापही समजू शकले नाही.
पहिल्या सीझनमध्ये बज्याचे पात्र विशेष चर्चेत आले होते. पैलवान बजरंग पाटील ही भूमिका आणि एक डायलॉग विशेष गाजला होता. बज्याचा ‘एका बुक्कीतच’ डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आता तो या मालिकेत नक्की दिसणार की नाही हे जाणून घेण्यासाठी सगळेच प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा
–‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच
-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता










