‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक विनोदी चित्रपट आणि कलाकार झाले आहेत. असाच विनोदी कलाकारांसोबत एक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजेच ‘पांडू’ होय. या चित्रपटात भाऊ कदम, कुशल बद्रिके यांच्या जोडीसह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाली आहेत. चित्रपटातील गाण्यांनी तर अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. सोनाली आणि भाऊची जोडी चांगलीच गाजत आहे. त्यांचे ‘केळेवाली’ आणि ‘भुरुम भुरुम’ हे गाणे तर सगळ्यांना खूप आवडले आहे. सोशल मीडियावर तर या गाण्याच्या अनेक रिल्स तयार केल्या जात आहेत. चाहत्यांपासून ते अनेक कलाकार देखील या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. अशातच ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेतील राया आणि कृष्णा म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन यांनी देखील या गाण्यावर व्हिडिओ केला आहे.

वैभवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही त्यांच्या मालिकेतील पात्रांच्या वेशात दिसत आहेत. कृष्णा आणि राया या गाण्याच्या स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ खूपच छान आहे. दोघेही या मूळ गाण्याचा डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Vaibhav Chavhan and shweta Rajan’s bhurum bhurum song’s video viral on social media)

त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३८ हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच कलाकारही कमेंट करत आहेत. सोनाली कुलकर्णीने “भारी ना राव” अशी कमेंट केली. तसेच, प्रार्थना बेहेरेनेही कमेंट करत लिहिले की, “सो क्यूट.” एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “माझ्याकडे शब्द सुद्धा नाही एवढा भारी व्हिडिओ आहे.” तसेच बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘मन झालं बाजिंद’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मालिकेत कृष्णा आणि राया यांची जोडी सगळ्यांना खूप आवडते. नुकतेच मालिकेत दोघांची इच्छा नसताना त्यांचे लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत सध्या खूपच रंजक वळण चालू आहे. श्वेताने याआधी कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत संजीवनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता

-जब्याच्या ‘शालू’ने घेतली मोठी भरारी, आपल्या दमदार अभिनयाने गाजवणार बॉलिवूड

-भाई का बड्डे हो गया स्पेशल! प्रथमेश परबने वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला दिली ‘ही’ महागडी भेट


Latest Post

error: Content is protected !!