Friday, April 26, 2024

‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना येऊन आता ७० दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रवासात अनेकजण घराबाहेर गेलेत, तर घरात राहिलेल्या आठ जणांनी प्रत्येक गोष्ट स्वीकारून इथपर्यंतचा प्रवास केला आहे. गेले सत्तर दिवस हे सगळे त्यांच्या कुटुंबीयांना एकदाही भेटले नाही. अशातच बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक पार पडला आहे. सगळ्या स्पर्धकांचे जवळचे लोक या आठवड्यात त्यांना भेटायला आले होते. त्यामुळे घरातील एकंदरीत वातावरण अगदी भावुक झालं होतं. अशातच उत्कर्ष शिंदे याच्या परिवारातून त्याची पत्नी आणि भावाचा मुलगा त्याला भेटायला आले होते. कोरोनाचे भान राखून त्यांना बाहेरील माणसांना घरातील स्पर्धकांना थेट भेटता आले नाही. त्यांच्यामध्ये काच होती.

उत्कर्षची पत्नी येताच उत्कर्ष खूप खुश होतो. तो जेव्हा तिच्याजवळ जातो, तेव्हा त्याची पत्नी मात्र खूप भावुक होते आणि रडायला लागते, परंतु नेहमी प्रमाणेच त्याच्या विनोदबुद्धीने तो हलके फुलके वातावरण करून त्याच्या पत्नीचा मूड ठीक करतो. यासोबत ती त्याला खूप प्रेरणा देते. उत्कर्षची पत्नी त्याला सांगते की, “आता हत्ती गेला आहे आणि शेपूट राहिले आहे.” यावर उत्कर्ष म्हणतो की, “ते शेपूट पूर्ण करूनच येणार.” तसेच ती त्याला सांगते की, “तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं.” तसेच ती म्हणते की, “ट्रॉफी घेऊनच घरी यायचं पप्पांचं खूप मोठं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.” (Bigg Boss Marathi 3 : Utkarsh shinde wife come to BBM house in family week)

यानंतर त्याच्या भावाचा मुलगा तिथे येतो आणि त्याच्या खेळाचे खूप कौतुक करतो. तसेच त्याची पत्नी त्याला सांगते की, “आपलं क्लिनिक चालू झालं.” हे ऐकून उत्कर्ष खूप खुश झाला. त्याच्या पत्नीच्या भेटीनंतर उत्कर्षमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्याचा इथून पुढचा खेळ पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच

-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता

-जब्याच्या ‘शालू’ने घेतली मोठी भरारी, आपल्या दमदार अभिनयाने गाजवणार बॉलिवूड

हे देखील वाचा