Tuesday, June 25, 2024

‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता

मराठी मनोरंजनविश्वातील पहिला रॅपर म्हणून नावारूपास आलेला किंग जेडी अर्थात श्रेयश जाधव नेहमीच त्याच्या फॅन्ससाठी आणि प्रेक्षकांसाठी नवनवीन रॅप सॉंग घेऊन येत असतो. त्याचे गाणे म्हणजे संगीत प्रेमींसाठी पर्वणीच असते. आपल्या गाण्यातून मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याची त्याची कला सर्वांनाच खूप भावते. फक्त रॅप सॉंग नाही तर दिग्दर्शन आणि निर्मितीतही नावारूपास आलेला श्रेयश तरुणाईचा लाडका कलाकार आहे. आता पुन्हा एकदा श्रेयशने त्याच्या फॅन्ससाठी एक नवीन रॅप सॉंग आणले आहे. त्याच्या या नवीन गाण्याचे नाव ‘मैदान मार’ आहे.

नेहमीच आपल्या गाण्यातून रसिकांना वेगळे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रेयशचे ‘मैदान मार’ या गाण्यातून देशभक्ती, शौर्य, धैर्य आदी देशप्रेमाच्या भावनांनी ओतप्रोत असणारे हे गाणे सर्वच तरुणांसाठी एक प्रेरणा देणारे गाणे आहे. या गाण्यात श्रेयश मावळ्यांच्या आणि जवानांच्या वेशात दिसत आहे. जवानांच्या वेशात तो शत्रूशी दोन हात करत त्यांचा खात्मा करत आहे, तर मावळ्यांच्या वेशात तो सर्वाना लढाऊवृत्तीची शिकवण देत आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी मावळे आणि जवान जीवाची पर्वा न करता शत्रूला सामोरे गेले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे गाणे त्याने तयार केले आहे.

दोन्ही वेशभूषेत श्रेयशच्या नजरेत असणारा करारीपणा, देशप्रेमाची भावना स्पष्ट दिसून येते. त्याच्या या अप्रतिम गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर या त्रिनीती ब्रदर्सने संगीत दिले असून, या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन, त्रिनीती ब्रदर्स आणि श्रेयशचे आहेत. श्रेयशच्या दमदार आवाजातील या गाण्याचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण मनीष भट यांनी केले आहे. श्रेयसच्या या ‘आम्ही पुणेरी’ या श्रेयसच्या रॅपला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

श्रेयशने रॅप सॉंगसोबतच ‘ऑनलाईन- बिनलाईन’, ‘बसस्टॉप’, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे, तर ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा