Wednesday, June 26, 2024

‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय विवादित आणि स्पष्टवक्ता स्वभाव असलेले अभिनेते म्हणजे किरण माने होय. मालिका आणि चित्रपटात त्यांनी अनेक भूमिकांमधून काम केले. मात्र ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने आणि मालिकेसोबत झालेल्या त्यांच्या वादामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील कलाकारांनी, निर्मात्यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होता. त्यावेळी त्यांना मालिकेतून अचानक काढले. त्यांनी देखील मालिकेवर अनेक आरोप केले. मात्र या वादामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्ध आणि लोकप्रियता मिळाली आणि ते लाइमलाईट्मधे आले.

किरण माने ( Kiran Mane) सोशल मीडियावरही सतत सक्रिय आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्ट खूप व्हायरल होतात. चाहते त्यांच्या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया देखील देतात. अशातच आता किरण माने यांनी एक नवीन पोस्ट केली असून, ती चांगलीच गाजत आहे. किरण माने यांनी तुकोबारायांची पालखी संदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे.

त्यांना पोस्ट शेअर करताना लिहीले की, “..तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लै जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकनारा चांदीचा रथ झळकायला लागलाय.. चांदीची पालखी चमकायला लागलीय… हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी!

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत… तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. “तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो.” असं या कारागीरांचं म्हननं हाय.

रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आनि शुभ्र, लख्ख झळाळी आनली… तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करन्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग ! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्डमधी नाय गड्याहो. आजच्या नासलेल्या भवतालात, “भेदाभेद भ्रम अमंगळ” हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आनि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय !”

किरण यांच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहीले की, “दाद्या, लय भारी लिहिलेस रे. आज गरज हुती ह्या पोष्टची” तर दुसऱ्याने लिहीले की, “लै भारी पोस्ट किरण दादा.” त्यांच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. (Actor Kiran Mane’s post about Tukobaraya’s palanquin has gone viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने क्रिती सेननला मंदिरात निरोप देताना केले ‘हे’ कृत्य, भाजप नेते भडकले
धनश्री काडगावकरची चिमुकल्या लेकासाठी पोस्ट; म्हणाली, “मी फार मोठी चूक केली”

हे देखील वाचा