Thursday, January 29, 2026
Home कॅलेंडर अभिनयासोबतच कुरळे केस ही हटके ओळख असलेल्या अर्थात मकरंद देशपांडे यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

अभिनयासोबतच कुरळे केस ही हटके ओळख असलेल्या अर्थात मकरंद देशपांडे यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

‘दगडी चाळ’ चित्रपट म्हटले की पटकन डोळ्यासमोर येते ती अरुण गवळी म्हणजे डॅडीची मकरंद देशपांडे यांनी साकारलेली दमदार भूमिका. जय शंभो नारायण म्हणत त्यांनी या भूमिकेत आणलेला जिवंतपणा प्रत्येकालाच भावला होता. हा चित्रपट मकरंद देशपांडे यांच्या दमदार भूमिकेमुळे प्रचंड गाजला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. आज (६ मार्च) मकरंद देशपांडे यांचा वाढदिवस, जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल. 

मकरंद देशपांडे हे मराठी आणि हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आपल्या भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळेच एक प्रतिभावान आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची चित्रपट जगतात विशेष ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकेत दमदार भूमिका साकारल्या आहेत. आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ५६ वर्षीय मकरंद देशपांडे यांचा जन्म ६ मार्च १९६६ ला महाराष्ट्रातील डहाणुमध्ये झाला. त्यांंनी रत्नागिरीमधुन आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले. मकरंद देशपांडे यांना कॉलेजमध्येच नाटके लिहायची आवड निर्माण झाली होती. तेव्हापासूनच त्यांनी आपली अनेक नाटके लिहायला सुरूवात केली. त्यांचे वडील विनायक देशपांडे हे पोस्टात कामाला होते.

१९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. या चित्रपटातील त्यांची बाबाची भूमिका चांगलीच गाजली. त्याचबरोबर त्यांनी १९८९ मध्ये ‘सर्कस’ या कार्यक्रमातुन छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी अनेक टिव्ही कार्यक्रमात लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या या भूमिका लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांनी ‘सर्फरोश’, ‘मकडी’ सारख्या अनेक चित्रपटात सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच ते स्वतः एक उत्तम लेखक आणि नाटककार असून, त्यांनी अनेक दर्जेदार नाटके लिहीली आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी ते प्रचंड मेहनत घेत असतात. म्हणूनच त्यांच्या मोजक्याच भूमिका असल्या तरी त्या त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने त्या लोकप्रिय केल्या आहेत. ‘दगडी चाळ’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. यासाठी ते थेट अरुण गवळी यांची भेट घ्यायला तुरुंगात गेले होते. मकरंद देशपांडे हे त्यांच्या अनोख्या हेयर स्टाईलसाठी देखील ओळखले जातात. त्यांचे कुरळे, दाट आणि लांब केस ही त्यांची विशेष ओळख आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा