आपल्या अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारा अभिनेता विजय देवरकोंडा आता बॉलिवूडमध्येही धमाल करताना दिसणार आहे. त्याच्या आगामी ‘लायगर‘ या सिनेमाची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. यामागील कारण होते ते म्हणजे, या चित्रपटात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठ-मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती दोन्ही इंडस्ट्रीतील मोठे निर्माते करत आहेत. या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला आली आहे, ज्यात विजयच्या पात्राची ओळख सर्वांना झाली. या टिझरने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे.
विजयच्या (Vijay Deverakonda) ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाच्या टिझरला अवघ्या २४ तासातच आतापर्यंत १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विजयच्या चित्रपटाचा टिझर शुक्रवारी (३१ डिसेंबर) सकाळी जोरदार प्रमोशननंतर प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरमध्ये विजय एका फायटरच्या भूमिकेत आहे. जो एकेकाळी मुंबईत स्ट्रीट फायटर होता आणि नंतर तो आंतरराष्ट्रीय फायटर होऊन रिंगमध्ये एका मोठ्या फायटरशी लढतो. टिझरमध्ये धमाकेदार ऍक्शन दाखवण्यात आली आहे. विजयचा लूक सर्वांनाच वेड लावत आहे. त्याने त्याच्या शरीरावर खूप मेहनत घेतली आहे, जी स्पष्टपणे दिसते. यात विजय रागावलेल्या मुलाच्या भूमिकेत आहे. या टिझरला पहिल्या ९ तासात १२ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.
या टिझरच्या ताज्या अहवालानुसार, २४ तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळालेल्या चित्रपटांच्या टिझरच्या यादीत तो आला आहे. २४ तासांत या टिझरला १६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि १३ हजार कमेंट्सही मिळाल्या आहेत. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे २५ ऑगस्ट, २०२२ रोजी प्रेक्षकांसाठी तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
विजय देवरकोंडा दिग्गज बॉक्सर माईक टायसनला देणार झुंज
या चित्रपटात दिग्गज बॉक्सर माईक टायसन (Mike Tyson) काम करताना दिसत आहे. तो पहिल्यांदाच भारतीय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात विजय आणि माईक एकमेकांना भिडताना दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात विजय आणि माईक यांच्याशिवाय अनन्या पांडे, रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय देवरकोंडा या चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत आहे. आता त्याची पहिली झलक समोर आली असून प्रेक्षकांना हा टिझर व्हिडिओ खूपच आवडला आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा-