बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार होऊन गेले ज्यांनी खूपच मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले, तरी त्यातून मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. आजही अनेक दशकं उलटूनही या कलाकारांची नावे आणि त्यांचे काम अजरामर आहे. बॉलिवूडच्या पूर्वीच्या काळातील असे एक दिग्गज कलाकार म्हणजे मनमोहन (Manmohan) खलनायकी भूमिकांसाठी त्यांना खूपच ओळखले जायचे. २८ जानेवारी १९३३ मध्ये जमशेदपूर येथे त्यांच्या जन्म झाला. मनमोहन यांनी हिंदीसोबतच बंगाली, गुजराती, पंजाबी आदी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील काम केले. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांबद्दल आणि अभिनयाबद्दल खूपच प्रेम होते. म्हणूनच १९५० साली ते मुंबईत आले.

व्यावसायिक घरातून आलेले मनमोहन अशा मोजक्या नशीबवान लोकांपैकी एक होते, ज्यांना काम मिळवण्यासाठी अजिबात संघर्ष करावा लागला नाही. ६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक म्हणून मनमोहन यांनी त्यांची ओळख तयार केली. मनमोहन यांच्याबद्दल नेहमी असे म्हटले जाते की, मनोज कुमार (Manoj Kumar), प्रमोद चक्रवर्ती आणि शक्ती सामंत (shakti samant) हे कोणता सिनेमा तयार करत असले तर ते त्यांना न सांगतच सिनेमात एक भूमिका देत असे. याच मैत्रीचं अफायदा उचलत मनमोहन आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचे जीवनच बदलून टाकले.

शंकर – जयकिशन यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या मनमोहन यांनी खलनायक म्हणून त्यांचा नावलौकिक तयार केला. एकाच महिन्यात त्यांचे १४ सिनेमे प्रदर्शित झाले होते. मनमोहन यांनी कधीच कोणाला काम करण्यासाठी नकार दिला नाही. त्यांना नेहमीच इंडस्ट्रीमध्ये यारो का यार असे म्हटले जायचे. राजेश खन्ना, धर्मेंद्र, संजीव कुमार, जितेंद्र, सुजीत कुमार आदी कलाकारांचे जवळचे मित्र असलेल्या मनमोहन यांनी याच मैत्रीतून विनोद खन्ना यांची इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करून घेतली. विनोद खन्ना यांनी देखील खलनायक म्हणूनच या क्षेत्रात एन्ट्री केली होती.

लहानपणापासूनच मनमोहन यांना अभिनयाची खूप आवड होती. मनमोहन यांचे भाचे असणाऱ्या विनय यांनी एका मुलखतीमध्ये सांगितले की, “जमशेदपूर येथील एका भागात त्याकाळातील कॉमेडी कलाकार असणाऱ्या मुकरी, टुनटुन यांचा एक कार्यक्रम होणार होता. तेथील एका हॉटेलमध्ये हे कलाकार आणि तात्यांची टीम थांबली होती. हे जेव्हा मनमोहन यांना समजले तेव्हा ते तडक हॉटेलमध्ये गेले आणि तिथे सर्व कलाकारांचे खूप आदरातिथ्य केले ते पाहून कलाकार प्रभावित झाले आणि त्यांना मुंबईला सोबतच घेऊन गेले.”

मनमोहन यांनी ‘शहीद’, ‘जानवर’, ‘गुमनाम’, ‘आराधना’, ‘हमजोली’, ‘क्रांति’, ‘अमर प्रेम’ आदी अनेक चित्रपटांमधून आपल्या प्रभावी अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. २६ ऑगस्ट १९७९ मध्ये मनमोहन यांचे निधन झाले. आज त्यांचे चिरंजीव असणारे नितीन मनमोहन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहे. त्यांनी ‘बोल राधा बोल’, ‘लाडला’, ‘दीवानगी’, ‘भूत’ आणि ‘यमला पगला दीवाना’ आदी सिनेमे बनवले आहेत.
हेही वाचा-