×

बिग बॉसनंतर पहिल्यांदाच पती रितेशसोबत स्पॉट झाली राखी सावंत म्हणाली, ‘कशी आहे आमची जोडी?’

अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटले जाते. तिने नुकतेच एक बातमी दिली आहे की, ‘बिग बॉस १५’मधून ती बाहेर झाली आहे. ही बातमी ऐकून चाहतावर्ग फार नाराज झाला. परंतु राखी सावंत खूप खुश आहे. सध्या ती आपल्या पतीबरोबर आपल्या सुट्ट्या आनंदात घालवत आहे. बिग बॉस १५ मध्ये राखीने आणि तिच्या पतीने एंट्री घेऊन सगळ्यांचे मनोरंजन केले होते. परंतु राखी या शोमधून बाहेर गेल्यामुळे तिच्या चाहत्यांना वाईट वाटत आहे.

बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर राखी सावंत (rakhi sawant) पहिल्यांदा तिचा पती रितेशसोबत पहिल्यांदाच मीडियासमोर आली. याआधी दोघे एकत्र एकमेकांसोबत कधीच मीडिया समोर आले नव्हते. फोटोसाठी दोघांनी पोज दिली. या दोघांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (rakhi sawnat spot with her husbund after bigg boss)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मीडियाने या जोडीला कॅमेरात कैद केल आहे. व्हायरल भयानीने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघांच्या पोझ पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे की, “कसा दिसतोय माझा नवरा? कशी आहे आमची जोडी? आणि आपल्या नवऱ्याला बघून ती म्हणाली की, तुला सिक्स पॅक बनवायचे आहेत? लवकरात लवकर जिम जॉईन कर.”

राखी सावंतने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मेहनत, चिकाटी, आत्मविश्वासच्या जोरावर अजूनही इंडस्ट्रीमध्ये टिकून आहे. राखी सावंतचे खरे नाव निरु भेडा आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर तिला राखी सावंत हे नाव मिळाले. छोट्या पडद्यापासून मोठा पडद्यापर्यंत तिने उत्तम काम केलेलं आहे. राखी सावंतचे बालपणीचे आयुष्यात फार खडतर होते. वडील कॉन्स्टेबल होते.

हेही वाचा :

Latest Post