सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे कोणतीही गोष्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत असते. अनेक गोष्टी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतात. अशातच सोशल मीडियावर चेन्नईमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तमिळ अभिनेता मन्सुर अली खान पुराच्या पाण्यात त्याच्या घराबाहेर गावात एक गाणे गाताना दिसत आहे.
अभिनेत्याने शनिवारी (२७ नोव्हेंबर) रोजी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पुराच्या पाण्यात एका नावेचा बाथटब म्हणून वापर करताना दिसत आहे. चेन्नईमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने पूर आला आहे. शहरात रेड अलर्ट दिला आहे. चेन्नईमधील अनेक भागात पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Actor Mansoor Ali Khan’s floated a boat in the flood waters sang a song)
चेन्नईमध्ये शुक्रवारपासून (२६ नोव्हेंबर) जोरदार पाऊस चालू आहे. पुरात असलेल्या या शहरात आणखी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ही परिस्थिती पाहता अभिनेत्याने एक नाव तयार केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने जो व्हिडिओ शेअर केला आहे. तो त्याच्या घराच्या बाहेरचा आहे. या व्हिडिओमध्ये पाण्याची पातळी वाढत असल्याने त्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या सगळ्यांवर मार्ग काढण्याचा तो प्रयत्न करत आहे.
சென்னை நுங்கம்பாக்கம் ஸ்டெர்லிங் சாலையில் தனது வீட்டின் முன்பு தேங்கியுள்ள மழை வெள்ளத்தில் படகு ஓட்டி மகிழ்ந்த நடிகர் மன்சூர் அலிகான் – வீடியோ#mansooralikhan #chennaifloods pic.twitter.com/n04iVHasV6
— M.Govindaraji (@RJGovind104) November 27, 2021
या व्हिडिओमध्ये मन्सुर अली खान एक तमिळ गाणे गाताना दिसत आहे, ज्यातील पहिल्या ओळीची अर्थ आहे की, जर कोणाचा जन्म झाला आहे, तर त्याने तमिळनाडूमध्ये जन्म घेतला पाहिजे आणि चेन्नईमध्ये येऊन पोहले पाहिजे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सगळ्यांना चेन्नईबाबत खूप दुःख होत आहे. तसेच, ही परिस्थिती लवकरच ठीक होईल अशी प्रार्थना करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शिल्पा राजच्या ‘बुलेट पे जीजा’ गाण्याने यूटुबवर उडवली धमाल, ५० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार
-माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद