Monday, June 24, 2024

माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद

‘धक धक करने लगा’ हे गाणे ऐकले नसेल, असा कदाचित एकही प्रेक्षक नसेल. महत्त्वाचं म्हणजे, हे गाणे ज्या अभिनेत्रीवर चित्रीत झाले, तिने आपल्या अभिनयासह डान्सने सर्वांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे इतर कुणी नसून सर्वांची लाडकी माधुरी दीक्षित होय. माधुरी आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच माधुरी दीक्षितने तिचे गुजरातमधील कामाचे वेळापत्रक पूर्ण केले आणि तिचे काम संपल्यानंतर ‘धकधक गर्ल’ने गुजराती जेवणाचा आस्वाद घेतला. याची झलक तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

माधुरीने घेतला गुजराती जेवणाचा आनंद
माधुरीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोतून स्पष्ट होते की, ती गुजराती जेवणाचा आस्वाद घेत आहे. तिच्या ताटात खाण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. तिच्या ताटात दाळ, कढीसह वेगवेगळ्या भाज्या आहेत. तसेच, ती तेथील मिठाईंचाही आस्वाद घेताना दिसत आहे. याव्यतिरिक्त तिच्या टेबलवर ताकाने भरलेला ग्लास आहे आणि ती ढोकळा आणि भाकरवडी या गुजराती पदार्थाचा आस्वाद घेताना दिसत आहे. (Actress Madhuri Dixit Enjoying Gujrati Traditional Food Says It Is Tasty Farewell)

माधुरीने म्हटले सर्वोत्तम निरोप
माधुरीने आपला हा फोटो शेअर करत लिहिले की, “खूप खूप स्वादिष्ट निरोप आहे. आऊ जो (येते) पुन्हा भेट होईपर्यंत.” यासोबतच तिने शुक्रवार मूड आणि वर्क डायरीज यांसारख्या हॅशटॅग्जचाही समावेश केला आहे.

तिच्या या पोस्टला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. माधुरीने गुजरातमध्ये राहत पारंपारिक जेवणाचा पुरेपूर आनंद घेतला. काही दिवसांपूर्वी माधुरीने गुजराती थाळीची झलक दाखवताना एक रीलही शेअर केला होता.

गुजराती खाण्यासोबतच केला डान्स
माधुरीने शेअर केलेल्या या रीलमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने निळ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली आहे. तसेच ती शाकसोबत रोटी आणि पूरी खाताना दिसत आहे. असे असले, तरीही गुजराती जेवण ढोकळ्याविना पूर्ण होत नाही. आपले जेवण ताटामध्ये ठेवत माधुरी बसल्या बसल्या डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, “फूड = लव्ह.” यासोबतच तिने ‘गुजराती थाळी’, ‘व्हेनगर्लइनगुजरात’, ‘लव्हइजलव्ह’ यांसारख्या हॅशटॅग्जचाही समावेश केला होता.

तिच्या या व्हिडिओला १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले होते. तसेच, व्हिडिओला ९ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

माधुरीच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची सन २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलंक’ या चित्रपटात झळकली होती. यानंतर ती आता ‘फाईंडिंग अनामिका’ या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा