Saturday, June 15, 2024

‘बिग बॉस १५’मधील ‘या’ स्पर्धकावर राखी सावंतचा पती फिदा; प्रपोज केल्यानंतर राखीची रिऍक्शन पाहण्यासारखी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’जोरदार चर्चेत आहे. हा शो अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या शोमध्ये झालेली वाईल्ड कार्ड एन्ट्री. या शोमध्ये नुकतेच राखी सावंतने एन्ट्री केली आहे. त्यामुळे ती देखील चांगलीच चर्चेत आली आहे. कारण, तिने एका खास व्यक्तीसोबत एन्ट्री केली आहे. या शोमध्ये राखीसोबत तिचा पती देखील आला आहे. त्यामुळे या शोमध्ये चांगलीच रंगत आली आहे. शोमध्ये आल्यानंतर तिच्या पतीने शोमधील स्पर्धकाला प्रपोज केले आहे.

वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर आज पहिल्यांदा शोमध्ये वीकेंडचा वार होणार आहे, ज्याचा एक छोटासा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, राखी सावंतचा पती रितेश टेलिव्हिजनवर त्याच्या प्रेमाचा खुलासा करतो, परंतु त्याने त्याच्या प्रेमाचा खुलासा त्याच्या पत्नीसमोर नाही, तर दुसऱ्याच एका स्पर्धकासमोर करतो. ती म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी. (Rakhi Sawant husbund Ritesh propose Shamita Shetty in bigg boss 15 house in front of all)

या प्रोमोमध्ये दाखवले आहे की, सलमान खान वीकेंडच्या वारमध्ये सगळ्या स्पर्धकांना सांगतो की, राखी सावंतचा पती रितेशने शोमध्ये एन्ट्री घेण्यासाठी काहीतरी सांगितले होते. यावर रितेश म्हणतो की, त्याला शमिता आवडते. यानंतर रितेश हातात गुलाब घेऊन सगळ्यांसमोर शमिताला प्रपोज करतो. हे सगळं पाहून राखी सावंत हैराण होते. रितेश शमिताला इंग्लिशमध्ये प्रपोज करतो. यानंतर सलमान खान त्याला आठवण करून देतो की, “हे बिग बॉस आहे, बिग ब्रदर नाही.” यानंतर सगळेच जोर जोरात हसतात

हा प्रोमो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सगळ्यांना रितेशचा हा मजेशीर अंदाज खूप आवडला आहे. यावेळी राखीची रिऍक्शनही पाहण्यासारखी होती. असे असले, तरीही अजूनही प्रेक्षक हे मान्य करायला तयार नाही की, तो राखी सावंतचा पती आहे. राखी आणि रितेशसोबत देवोलीना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई यांनी देखील शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. या आधी त्या दोघी ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा