Monday, June 24, 2024

शिल्पा राजच्या ‘बुलेट पे जीजा’ गाण्याने युट्यूबवर उडवली धमाल, ५० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

सध्या भोजपुरी गाण्यांना सुगीचे दिवस आले आहेत. मोजक्या राज्यांपुरता मर्यादित असणारे हे भोजपुरी गाणे मागील काही काळापासून संपूर्ण देशात, किंबहुना जगात लोकप्रिय होत असल्याचे चित्र आहे. हटके तोंडावर रेंगाळणारे शब्द, उडती चाल, भडक सीन्स, कलाकारांचा अभिनय या आणि अधिक काही गोष्टींमुळे ही गाणी लोकप्रिय होतात. भोजपुरी गाण्यांना मिळणार प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता ही गाणी प्रत्येक वेळेस वेगवेगळे रेकॉर्ड तयार करतात. आठवड्याला ३/४ गाणी तरी प्रदर्शित होत असतात, आणि ही सर्वच खूप हिट होतात. सध्या असेच एक गाणे तुफान गाजत आहे, आणि ते गाणे म्हणजे ‘बुलेट पे जीजा’.

‘बुलेट पे जीजा’ या गाण्याने यूट्युबवर नुसता धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी या गाण्याचे कौतुक करत असून, गाणे आवडले असल्याच्या देखील भरपूर कमेंट्स देखील देत आहे. या गाण्याला भोजपुरीमधील प्रसिद्ध गायक असणाऱ्या विनय पांडे सानू यांनी आणि शिल्पा राज हीने आवाज दिला आहे. तर या गाण्याचाच व्हिडिओ विनय पांडे आणि अभिनेत्री आकांक्षा दुबे यांच्यावर चित्रित करण्यात आला आहे. समर सिंग ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवर रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ५० मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच हे गाणे सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

‘बुलेट पे जीजा’ या गाण्याला सोशल मीडियावर मिळणार प्रतिसाद देखील गाण्याच्या टीमला सुखावून जात आहे. या गाण्याची लोकप्रियतेमुळे बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आदी ठिकाणी होणाऱ्या लग्नात हेच गाणे वाजताना दिसत आहे. या गाण्याच्या व्हिडिओला अधिक ग्लॅमरस आणि बोल्ड आकांक्षा दुबेच्या अदांनी बनवले आहे. या गाण्यासोबतच गाण्याच्या मागे दिसणाऱ्या सर्व लोकेशन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या गाण्याचे शब्द विमलेश उपाध्याय यांनी लिहिले असून, आशिष वर्माने गाण्याला संगीत दिले आहे. तर गोल्डी जयस्वाल आणि बॉबी जॅक्सन यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. हे गाणे ‘रिल्स बनी मंदिर के गेट पा जीजा’ या म्युझिक अल्बममधील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा