Monday, February 26, 2024

मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, हॉस्पिटलमधून डिस्चार्जसोबत अभिनेत्याची तब्येत एकदम ठणठणीत

बॉलिवूडमधील सुपरस्टार आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun chakraborty) यांना काही दिवसांपूर्वी अचानक छातीत दुखायला लागले होते त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले होते. त्यांच्या आजाराबद्दल त्यांच्या चाहत्यांना खूप काळजी वाटत होती. परंतु आता त्यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे आता त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडले आहे. त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. १२ फेब्रुवारी रोजी त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आलेले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना शनिवारी, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी मिथुन चक्रवर्ती यांना छातीत दुखायला लागले, त्यामुळे त्यांना कोलकाता मधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली मिथुन यांच्यावर उपचार झाले. रुग्णालयाने मिथुन यांच्या प्रकृतीबाबत एक निवेदन जारी करून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एमआरआयसह अनेक चाचण्या घेण्यात आल्या. आदल्या दिवशी, वरिष्ठ डॉक्टर आणि डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती सामायिक केली होती.

आता अभिनेता रुग्णालयातून घरी परतल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना ते म्हणाले की, “खरं तर काहीच अडचण नाही, मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. परंतु बघू, मी लवकरच कामाला सुरुवात देखील करणार आहे. कदाचित उद्यापासूनच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मला फोन केला होता आणि प्रकृतीची काळजी न घेतल्याने त्यांना पंतप्रधानांकडून फटकारावे लागले, असेही मिथुन चक्रवर्ती म्हणाले”.

भाजप खासदार दिलीप घोष यांनीही सकाळी रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्याच वेळी, भाजप नेत्याने देखील असे सांगितले होते की, “आता अभिनेता पूर्णपणे ठीक आहे आणि लवकरच त्याच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग सुरू करेल.” याआधी त्यांचा मुलगा नमोशी यानेही वडिलांच्या प्रकृतीबाबत बोलले होते. त्याने सांगितले होते की< वडील मिथुनला त्याचा भाऊ मिमोह आहे आणि ते त्याची काळजी घेत आहेत. नमोशी स्वतः त्याची आई योगिता बालीसोबत असून तिची काळजी घेत आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या बातमीनंतर अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि बंगालीमध्ये एका व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘मला अभिमान आहे, मला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याची भावना आज जाणवते. ती पूर्णपणे वेगळी भावना आहे. खूप छान भावना आहे.’

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक, ‘या’ ठिकाणी घेणार बांधणार लग्नगाठ
बिग बॉस फेम मनारा अन् अभिषेक रोमँटीक अंदाजात, ‘सांवरे’ सॅांग लॉन्च

हे देखील वाचा