Monday, March 4, 2024

बिग बॉस फेम मनारा अन् अभिषेक रोमँटीक अंदाजात, ‘सांवरे’ सॅांग लॉन्च

सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमी असते. विशेष म्हणजे बिग बॉसमधील केमिस्ट्री पाहायला ऐकायला आणि वाचायला चाहते नेहमीच आतुर असतात. अशातच बिग बॉस फेम मनारा अन् अभिषेक दोघेही रोमँटीक अंदाजात पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे दोघांच्या नात्यासंदर्भात अनेक चर्चां रंगू लागल्या आहेत. अशातच दोघांचे ‘सांवरे’ सॅांग लॉन्च झाले आहे. दोघांचा रोमँटीक अंदाज पाहून सिने विश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

बिग बॉसचा 17 वा सिझन गाजवणारी स्पर्धक म्हणजे मनारा चोप्रा. या प्रवासादरम्यान मनाराच्या जीवनात अनेक चढ उतार आले. पण खचून न जाता ती खेळत राहिली. मनारा अंतिम फेरी पर्यंत पोहचली पण बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकली नाही. यावेळी अनेकांसोबत तिची चांगली मैत्री झाली. तर या १७ व्या सिझन दरम्यान हँडसम बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिषेक कुमार मनाराचा चांगला मित्र बनला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दोघांच्या रोमान्सची चर्चा रंगली आहे. नुकतंच दोघांच ‘सांवरे’ हे साँग लॉन्च झालं असून दोघांच्या जोडीने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

खुप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मनारा अन् अभिषेकचे ‘सांवरे’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘सांवरे’ हे गाणं अंशुल गर्गने लिहले असून गाण्याचे कंम्पोज अखिल सचदेव आणि कार्तिक देव यांनी केलं आहे. या गाण्यामध्ये मनारा आणि अभिषेक यांची छोटीशी लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चंदीगडमध्ये दोघे एकत्र दिसले होते. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करत चाहते मुन्नावर फारुकीला ट्रोल करताना दिसत आहेत.

मनारा अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबत फॅशन डिझायनर आहे. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनाराने मुंबई गाठली. मॉडेलिंग करत तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 40 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये तिने काम केलं आहे. मनाराने 2014 मध्ये अनुभव सिन्हा यांच्या ‘जिद’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. आजवर तिने अनेक तेलुगू, तामिळ, हिंदी आणि कन्नड सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘जिद’ या सिनेमानंतर अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळाली. थिक्का, दुष्ट, जक्कन्ना या तेलुगू सिनेमांत तिने काम केलं. ‘जिद’ या सिनेमासह अभिनेत्रीने सीता, दुष्ट, थिक्का, जक्कन्ना, कावल, संदामारुथम, प्रेमा गीमा जांथा नाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

२०१८ मध्ये ‘ये प्यार नहीं तो क्या है’ या म्युझिक व्हिडीओमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर अभिषेकने २०२१ मध्ये ‘उडारियां’ मालिकेतून टेलिव्हिजनवर एन्ट्री घेतली. यामध्ये त्याने अमरीक सिंह विर्क ही भूमिका साकारली होती. तसेच अभिषेकने करिअरमध्ये आलिया भट्ट व वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये लहानशी भूमिका केली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या मागे त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका, नवा पोस्टर आला समोर
आमिर खानची एक्स वाइफ म्हटल्याने नाराज झाली किरण राव; म्हणाली, ‘माझी स्वतःची ओळख आहे’

हे देखील वाचा