Saturday, April 20, 2024

बॉयकॉट करुनही सुपरहिट, दिग्दर्शक अयान मुखर्जींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘बॉयकॉटची चिंता आम्हाला…’

सध्या सिनेसृष्टीत ब्रम्हास्त्र चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूड चित्रपटांवर प्रेक्षकांचा जोरदार रोश पाहायला मिळत असतानाही ब्रम्हास्त्र चित्रपटाने जोरदार कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचेही जोरदार कौतुक होताना दिसत आहे. त्याआधी अयान मुखर्जी यांनी बॉयकॉट ट्रेंड आणि ब्रम्हास्त्रच्या यशाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. रिलीजपूर्वी सोशल मीडियावर चित्रपटावर टाकलेला बहिष्कारही फसला. आता ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी बहिष्काराच्या या ट्रेंडबाबत मौन तोडले आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ संपवला आहे. ब्रह्मास्त्रच्या यशाचे श्रेय देखील दिग्दर्शक अयान मुखर्जीला जाते. वास्तविक अयानने आपल्या आयुष्यातील दहा वर्षे ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी घालवली. त्याचे स्वप्न साकार केले. दरम्यान, अयानने सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रच्या बहिष्काराबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.

मुलाखतीत अयान मुखर्जीने सांगितले आहे की, “होय, मला चित्रपटाच्या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल चिंता होती. त्यामुळे आमच्या चिंता नक्कीच वाढल्या, पण आम्ही आमच्या चित्रपटाबद्दल खूप सकारात्मक होतो. म्हणूनच आम्ही बहिष्काराच्या ट्रेंडवर जास्त लक्ष न देता आमचा चित्रपट प्रत्येक व्यक्तीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. आमच्या चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिले होते की प्रकाश येत आहे आणि ब्रह्मास्त्रच्या माध्यमातून आम्ही नवीन प्रकाश आणला आहे. लोकांनी आमचा चित्रपट पाहावा, असे आवाहन आम्ही केले. ज्यांना आमचा चित्रपट पटला नाही त्यांनी आम्हाला VFX कसे केले ते सांगण्याची संधी द्या. जगातल्या कोणत्याही पौराणिक चित्रपटात असे झालेले नाही असे मला वाटते.”

दरम्यान चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये  जोरदार कमाई करताना दिसत असून चित्रपटाने आत्तापर्यंत 200 कोटीची कमाई केली आहे.

हेही वाचा –विकीच्या वडिलांनी उंचावली खानदानाची मान! नॉर्वेत ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने झाला सन्मा
प्रभास ते यश, ‘या’ दाक्षिणात्य कलाकारांची खरी नावे माहित आहेत का? जाणून घ्याल तर चकित व्हाल
जान्हवी कपूरने एक्स बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली, ‘हॅप्पी बर्थडे माय हार्ट’

हे देखील वाचा