Monday, July 1, 2024

‘अखंड’ सुपरहिट होताच नंदामुरी बालकृष्णांनी घेतला मोठा निर्णय, मानधनात केली तब्बल ‘इतकी’ वाढ

कोरोना विषाणूच्या काळात खूप कमी भारतीय कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्यास सक्षम ठरले आहेत. कारण कोरोनामुळे शासनाच्या नियमांनुसार चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. याच कारणामुळे चित्रपटांचे प्रदर्शन ओटीटी प्लॅटफॉर्मवर केले गेले. कोरोनाच्या धोक्याच्या काळात अद्यापही प्रेक्षक जोपर्यंत एक चांगला चित्रपट समोर येत नाही तोपर्यंत घर सोडत नाहीत. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकार नंदामुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. नंदामुरी यांचा काही दिवसांपूर्वीच ‘अखंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. कोरोनाच्या काळात या चित्रपटाने नोंदवलेल्या आकडेवारीमुळे व्यापार तज्ज्ञ खूप खूश आहेत. ट्रेड पंडितांनी ‘अखंड’च्या यशाचे श्रेय नंदामुरी यांच्या स्टारडमला दिले आहे.

‘अखंड’ चित्रपटाच्या बंपर यशानंतर नंदामुरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘अखंड’ सुपरहिट होताच नंदामुरी यांनी आपली फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘अखंड’च्या यशापूर्वी नंदामुरी बालकृष्ण एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये मानधन घेत होते, परंतु आता ते एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेतील.

नंदामुरी यांनी ‘अखंड’च्या यशानंतर लगेचच त्यांची फी दुप्पट केली आहे. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. परंतु ट्रेड ऍनालिस्ट हा योग्य निर्णय असल्याचे सांगत आहेत. कोरोनाच्या काळात ‘अखंड’ने नोंदवलेल्या आकड्यांनंतर नंदामुरी हे या शुल्काचे पात्र असल्याचे ट्रेड ऍनालिस्टचे म्हणणे आहे.

नंदामुरी यांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी १०० हून अधिक चित्रपट केले आहेत आणि ते दक्षिणेतील यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. नंदामुरी यांचा ‘अखंड’ लवकरच हिंदीतही रिमेक होणार आहे. निर्माता साजिद नाडियादवाला ‘अखंड’च्या हिंदी रिमेकचे हक्क विकत घेण्यात व्यस्त आहे. अक्षय कुमार किंवा अजय देवगणसोबत तो हिंदीत ‘अखंड’ बनवणार आहे.

हे देखील वाचा