नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता पर्ल पुरी याला या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे तो खूपच चर्चेत होता. अनेकजण त्याला सपोर्ट करत होते, तर अनेकांचे असे म्हणणे होते की, असे कृत्य करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. आता नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, त्याला जामीन मिळाला आहे. वसई सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली होती. माध्यमातील माहितीनुसार वकील जितेश अग्रवालने पर्ल पुरीची जामीन करण्याची माहिती दिली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाकडून पर्ल पुरीला 25 हजार रुपयांच्या बाँडवर जामीन मिळाला आहे. परंतु या सोबतच त्याला कोर्टाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. जसे की, त्याला जामीन मिळाल्यानंतर तो पीडित मुलीने केलेले आरोप तसेच तिच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीसोबत छेडछाड करू शकत नाही. देशाच्या बाहेर जायचे असेल, तर त्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.
पर्ल पुरीचे समर्थन बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी केले आहे. यामध्ये एकता कपूर, दिव्या खोसला कुमार, निया शर्मा, हिना खान यांसारख्या कलाकारांचा समावेश होतो. त्यांचे असे म्हणणे होते की, पर्ल पुरी हा खूप चांगला अभिनेता तसेच एक चांगला व्यक्ती देखील आहे. तो असे कृत्य करणे शक्यच नाहीये.
पीडित मुलीच्या आईचे असे म्हणणे आहे की, तिचा पती मुलीच्या कस्टडीसाठी अशा प्रकारचे आरोप लावत आहे. नुकतेच त्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या वकिलामार्फत सांगितले आहे की, त्याच्या मुलीवर चिखल फेक करणे थांबवा. त्याने त्या अभिनेत्याचे नाव घेतले नाही, तर त्याच्या मुलीनेच त्याला ओळखले आहे. काही टीव्ही कलाकारांचे असे म्हणणे आहे की, त्याच्या विरोधात कोणीतरी चाल खेळत आहे आणि त्याला या अशा गोष्टीमध्ये अडकवत आहेत.
नुकतेच काही दिवसांपूर्वी एकता कपूरने त्याच्याबद्दल एक भली मोठी पोस्ट शेअर केली होती. तसेच दिव्या खोसलानेही मोठी पोस्ट केली होती. ‘नागीन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीने देखील पोस्ट करून पर्ल पुरी निर्दोष असल्याचे सांगितले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
नादच खुळा! कमाईच्या बाबतीत आमिर खानलाही टक्कर देते पत्नी किरण राव, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती
सनी लिओनी विकणार लॉस एंजेलिसमधील घर? एक एकरात आहेत ६ बेडरूम अन् स्विमिंग पूलसारख्या लग्झरी सुविधा