सनी लिओनी विकणार लॉस एंजेलिसमधील घर? एक एकरात आहेत ६ बेडरूम अन् स्विमिंग पूलसारख्या लग्झरी सुविधा


बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. आता ती तिच्या लॉस एंजेलिसमधील घरामुळे चर्चेत आहे. लॉस एंजेलिसमध्ये सनी लिओनी आणि तिच्या पतीचे खूप सुंदर घर आहे. या दिवसात तिने तिच्या या सुंदर घराला विकण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ती तिचे हे घर का विकत आहे, याची माहिती अजूनही कोणाला मिळाली नाहीये.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सनी लिओनी आणि डॅनिअल वेबर यांचे हे घर एक एकरमध्ये पसरलेले आहे. त्यांचे हे घर डोंगरात आणि हिरवळीमध्ये आहे. त्यांचे हे घर पारंपारिक पद्धतीचे आहे. यामधील प्रत्येक खोलीत इंटेरियर केलेले आहे. सनीच्या या घरामध्ये 6 बेडरूम, स्टाफ क्वार्टर, गेस्ट लॉफ्ट यांसारख्या सुविधा आहेत.

यासोबतच सनीच्या घरात लिव्हिंग रूम, फॅमिली रूम, डायनिंग रूम, किचन आणि एक बार देखील आहे. तसेच तिच्यात घरात एक स्विमिंग पूल देखील आहे. ती नेहमीच स्विमिंग पूलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सनी लिओनीचे लॉस एंजेलिसमधील हे घर हवेशीर आणि मोकळ्या जागेत आहे.

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर तिला मुंबईमध्ये स्पॉट केले गेले होते. यावेळी ती तिच्या 3 मुलांसोबत स्पॉट झाली होती. यामध्ये ती कांचनुमा गेटवरून बाहेर पडताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिने काळा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राउजर घातलेली दिसली होती. तसेच तिने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले होते. तिने मास्कही लावला होता.

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागच्या वर्षी ‘बुलेट्स’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत होती. तसेच ती विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. यासोबतच आणि मल्याळम चित्रपट ‘शिरो’ आणि तमिळ चित्रपट ‘विरमादेवी’ यामध्ये दिसणार आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्ये ‘जिस्म 2’, ‘हेट स्टोरी 2’, ‘रागिणी एमएमएस 2’, ‘एक पहिली लीला’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल’मधील स्पर्धकाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारली होती थोबाडीत; जुना व्हिडिओ व्हायरल

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.