Tuesday, July 9, 2024

नुसते नाव नाही, तर अंदाज अन् वागणूकही होती ‘राजकुमार’ सारखीच, एका हट्टामुळे थांबवली होती सिनेमाची शूटिंग

आजकाल आपण अनेकदा कलाकार आणि त्यांच्या सेटवरील नखऱ्यांबद्दल ऐकतच असतो. कलाकार आणि नखरे हे जणू समीकरणच झाले आहे. जेवढा मोठा कलाकार तेवढे अधिक नखरे. कलाकार आणि त्यांचे नखरे हे फक्त आताच नाही, तर फार पूर्वीपासूनच चालत आले आहे. अनेक जुन्या मोठ्या कलाकारांबद्दल आणि त्यांच्या नखऱ्यांबद्दल आजही बरेच किस्से प्रसिद्ध आहेत. असेच एक कलाकार होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या भारदस्त आवाजाने आणि अजरामर संवादांनी तुफान लोकप्रियता मिळवली, आणि ते कलाकार आहेत राजकुमार. ६० च्या दशकातील तुफान लोकप्रिय अभिनेते अशी ओळख असलेले राजकुमार नावाप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही राजकुमार होते. आज त्यांच्याशीच संबंधित एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा किस्सा आहे राजकुमार, वहीदा रहमान, मनोज कुमार आणि बलराज साहनी यांच्या अतिशय सुंदर अभिनयाने नटलेल्या ‘नीलकमल’ चित्रपटसंदर्भातला. एव्हरग्रीन चित्रपट म्हणून ‘नीलकमल’ सिनेमा ओळखला जातो. या चित्रपटातील ‘बाबुल की दुआएं लेती जा’, ‘आजा तुझको पुकारे मेरा प्यार’, ‘मेरे रोम-रोम में बसने वाले राम’ आदी सदाबहार गाणी आजही लोकांच्या ओठांवर रुळताना आपण बघतो. असा हा नीलकमल सिनेमा म्हणजे उत्तम कलाकृतीचे उदाहरण आहे.

राम माहेश्वरी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा सिनेमा एका झोपेत चालणाऱ्या मुलीवर आधारित असून तिचा संबंध मागील जन्माशी असतो. अशी कथा आहे. या चित्रपटात राजकुमार यांनी एका मूर्तिकाराची भूमिका साकारली आहे, तर वहीदा रहमान यांनी डबल रोल केला आहे. या सिनेमाची शूटिंग चालू होती. राजकुमार तसे स्वभावाने अतिशय हट्टी आणि स्वतःच्या अटींवर काम करणारे कलाकार होते. त्यांना एका सीनमध्ये काही दागिने घालायचे होते. ते दागिने पाहून राजकुमार यांना खूप राग आला. कारण, ते दागिने खोटे होते. त्यांनी निर्माता दिग्दर्शकांना सांगितले की, जर खरे दागिने देणार असतील तरच शूटिंग करेल नाहीतर नाही. मी खोटे दागिने घालणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

राजकुमार यांच्या या हट्टापुढे सर्वच जण झुकले आणि त्यांच्यासाठी खरे दागिने मागवण्यात आले. दागिने येता तोपर्यंत सर्व शूटिंग थांबली होती. दागिने आल्यानंतर ते घालून मग त्यांनी शूटिंग केली. राजकुमार यांचा हट्ट सर्व पूर्ण करायचे. कारण, ते त्या ताकदीचे कलाकार देखील होते. त्यांचा राग, त्यांचा हट्ट ही त्यांची दुसरी ओळख होती. राजकुमार एक अभिनेता होण्यासोबतच ते सब इन्स्पेक्टर देखील होते, त्यांनी १९५२ साली ‘रंगिली’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास

हे देखील वाचा