राहुल वैद्य पत्नी दिशा परमारसाठी बनला रिक्षा ड्रायव्हर, मात्र अभिनेत्री झाली बेहाल


राहुल वैद्यने (Rahul Vaidya) ‘बिग बॉस १४’ (Bigg Boss 14) मध्ये राष्ट्रीय टेलिव्हिजनवर दिशा परमारला (Disha Parmar) लग्नासाठी प्रपोज केले. हे दोघेही छोट्या पडद्यावरील सर्वात क्यूट जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. राहुल किंवा दिशा जेव्हाही सोशल मीडियावर जे काही शेअर करतात, ते लगेच सोशल मीडियावर व्हायरल होते. अलिकडेच राहुलने त्याची सुंदर पत्नी दिशा परमारसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आणि दिशा कोलकाताच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

राहुल वैद्यने दिशा परमारला करायला लावला रिक्षातून प्रवास
अलिकडेच राहुलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो दिशा परमारला रिक्षात फिरवताना दिसत आहे. खरंतर दोघेही एका लग्नात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे पोहोचले होते आणि इथे पोहोचल्यानंतर दोघांनी खूप मजा केली. या दोघांचे व्हिडिओ पाहून दिशाला रिक्षात बसवताना राहुल खूप एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट होते. मात्र दिशा परमारचे हाल होत आहेत.

घाबरलेली दिसत होती दिशा परमार
राहुलने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये दिशा रिक्षात बसली असून, राहुल रिक्षा चालवत आहे. दिशाला ही राईड देताना राहुल खूप खूश दिसत असला, तरी दिशा मात्र खूपच घाबरलेली दिसत आहे. चाहत्यांना या दोघांचा हा व्हिडिओ खूप आवडला असून, यावर ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या दोघांच्या या व्हिडिओवर चाहते सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यावर एका युजरने कमेंट करताना म्हटले की, “दिशूल सर्वात क्यूट कपल आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “तू खूप चांगला नवरा आहेस राहुल वैद्य.” त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा जोरदार पाऊस पाडला. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दोघांचे जुलैमध्ये झाले होते लग्न
राहुल आणि दिशा १६ जुलै २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. राहुल आणि दिशा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांचे नाते त्यांच्या चाहत्यांना किंवा मीडियाला कधीच माहीत नव्हते.

‘बिग बॉस १४’ मध्ये केले प्रपोज
राहुल वैद्य बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. ‘बिग बॉस १४’ मध्‍ये त्याचा प्रवास खूप पसंत केला गेला होता. या शोदरम्यान, व्हॅलेंटाइनच्या खास प्रसंगी राहुल वैद्यने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले. ज्यामध्ये त्याला त्याचा मित्र एली गोनीने मदत केली होती. राहुल वैद्य बिग बॉसच्या घरात असताना दिशा त्याला सोशल मीडियावर सतत पाठिंबा देत होती.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!