Friday, June 14, 2024

नाचा रे! रणवीर सिंग ते आलिया भट्ट, ‘या’ कलाकारांनी दिल्लीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यात घातला धुमाकूळ

सध्या सर्वत्र लग्नसराईचा सीझन पाहायला मिळत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून ते टीव्ही कलाकारांपर्यंत लग्नाची धूम सुरू आहे. बॉलिवूडमधील काही लग्नांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच काही विवाहसोहळे आहेत ज्यामध्ये सिनेतारकांची धूम असते. अलीकडेच टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्या आणि राहुल शर्मा यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यांच्या लग्नाला देखील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

एखाद्या कलाकाराचे लग्न म्हटले की, अनेक कलाकार लग्नाला हजेरी लावतात. तो कार्यक्रम खास बनवण्यासाठी प्रयत्न करतात. अभिनेत्यांसोबतच अभिनेत्री देखील आपल्या दिलफेक अदा दाखवत कार्यक्रम रंगीबेरंगी बनवतात. दिल्लीतील अशाच एका लग्नात बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनी हजेरी लावली आणि सगळ्यांनी आपला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh), अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) नोरा फतेही (Nora Fatehi), क्रिती सेनन (Kriti Senan) यांसारखे सर्व कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

रणवीर सिंग
रणवीरने स्वतःच्याच ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘खलीबली’ गाण्यावर स्टेजवर धमाका केला. याशिवाय ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आंख मारे’ या गाण्यावरही त्याने धमाल केली. इतकंच नाही, तर त्याने रॅप गाऊन त्याच्यातल्या ‘गली बॉय’ची झलकही दाखवली.

आलिया भट्ट आणि कियारा आडवाणी
त्याचवेळी आलियाने ‘तम्मा तम्मा’, ‘बद्री की दुल्हनिया’ आणि ‘लडकी ब्यूटीफुल’वर डान्स केला. ‘शेरशाह’ अभिनेत्री कियारा आडवाणीनेही या लग्नात चांगलीच रंगत आणली.

क्रिती सेनन आणि नोरा फतेही
क्रिती सेनन ‘कोका कोला तू’ गाण्यावर डान्स करत आहे आणि नोरा फतेहीने ‘साकी साकी’ गाण्यावर डान्स करून पाहुण्यांचे मनोरंजन केले आहे.

‘या’ चित्रपटात आलिया-रणवीर दिसणार आहेत एकत्र
आलिया भट्ट आणि रणवीर कपूर करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासोबत दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगग! अभिजीत बिचकुलेला टॉयलेटला जाणे वाटते बोरिंग, कारण ऐकून राखी सावंतने दिली ‘अशी’ रिऍक्शन

-फॅनने प्रियांकाला आय लव्ह यू म्हटल्यावर निकने दिली ‘ही’ रिऍक्शन

-सेटवर उशिरा पोहचल्यामुळे किरण खेर यांनी बादशाहला फटकारले, थोडक्यात वाचला बादशहा

हे देखील वाचा