Saturday, June 15, 2024

अगग! अभिजीत बिचकुलेला टॉयलेटला जाणे वाटते बोरिंग, कारण ऐकून राखी सावंतने दिली ‘अशी’ रिऍक्शन

‘बिग बॉस १५’ च्या घरात वाईल्ड कार्डने एन्ट्री केल्यानंतर दररोज एक नवीन गोंधळ प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षकांना हा गोंधळ आवडला आहे, तर काही प्रेक्षकांना हा तमाशा पाहून आनंद होत नाही. मंगळवारच्या (३१ नोव्हेंबर) एपिसोडमध्ये, शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेल्या अभिजीत बिचुकलेने (Abhijeet Bichkule) राखी सावंतला (Rakhi Sawant) अशी गोष्ट सांगितली की, ऐकून राखी थक्क झाली. अभिजीतच्या बोलण्याने राखीला धक्का बसला. कारण, त्याने तिला सांगितले की, तो कमी खातो कारण त्याला दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा टॉयलेटला जायला आवडत नाही.

अभिजीतला टॉयलेटला जाणे वाटते बोरिंग, कारण ऐकून राखी झाली हैराण
वॉशरूम परिसरात राखी आणि अभिजीतमध्ये जेवणाबाबत चर्चा होत होती. राखीने अभिजीतला विचारले की, तो जास्त जेवण का करत नाही. याला उत्तर देताना अभिजीतने आश्चर्यकारक उत्तर देऊन राखीला गोंधळात टाकले. अभिजीतने सांगितले की, त्याला टॉयलेटला जाणे खूप बोरिंग वाटते. त्यामुळे तो २४ तासांतून एकदाच टॉयलेटला जातो. त्याला टॉयलेटमध्ये कमी जावे लागावे, त्यामुळे तो जेवण जास्त करत नाही. राखी आणि अभिजीतमधील हे संभाषण मजेदार होते.

अभिजीत म्हणाला की, “मी २४ तासांतून एकदाच टॉयलेटला जातो.” मग राखीने विचारले, “तुला टॉयलेटला जाणे बोरिंग वाटते का?” प्रत्युत्तरात अभिजीत म्हणाला, “हो, भाऊ मी जेवलो नाही.” मग राखीने विचारले, “वास येतो म्हणून जात नाहीस का.” अभिजीतने उत्तरात हो म्हटले. टॉयलेटला जाण्याचा कंटाळा येतो, त्यामुळे तो जास्त खात नाही, हे अभिजीतचे विधान राखीच्या पचनी पडले नाही.

मंगळवारचा बिग बॉसचा एपिसोड पूर्णपणे अभिजीतच्या नावावर होता. अभिजीतचे जेवणावरून घरात भांडण झाले. मात्र, अभिजीत याकडे दुर्लक्ष करत होता. अभिजीतही किचनमध्ये या भांडणाचा आनंद घेताना दिसला. अभिजीतचे जेवण हा भांडणाचा मुद्दा होता, पण या लढतीत अभिजीत नव्हता. प्रतीक सहजपाल, तेजस्वी प्रकाश आणि निशांत भट्ट यांच्यात लढत झाली. या भांडणात घरातील बहुतांश सदस्य निशांतसोबत उभे असल्याचे दिसले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा