बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास. प्रियांका आणि निक आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सर्वच लोकं शुभेच्छा देताना दिसत आहे. मागील काही काळापासून प्रियांका आणि निक घटस्फोट घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व बातम्या खोडत ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत असून, त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल होत आहेत.
नुकतीच प्रियांका आणि निकने ब्रिटिश फॅशन पुरस्कारांना हजेरी लावली होती. या पुरस्कारांच्या वेळेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यासोबतच प्रियांकाच्या लूकची देखील खूप चर्चा होत आहे. यासर्व व्हिडिओ आणि फोटोंमध्ये एक व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत लोकांच्या चर्चेचा विषय देखील बनत आहे.
या व्हिडिओमध्ये प्रियांका पुरस्करांच्या ठिकाणी पोचताना दिसत असून, गाडीतून उतरत असते तिच्यासोबत निक देखील आहे. निक आणि प्रियांका गाडीतून उतरत चालायला लागतात. त्यांना पाहून तिथे जवळच असलेले प्रेक्षक प्रियांका, प्रियांका, प्रियांका, निक, निक, निक ओरडायला लागतात आणि त्यातच एक प्रेक्षक जोरात ओरडून म्हणतो ‘आय लव्ह यू प्रियांका’ हे एकटाच निक चालत असताना थांबतो आणि मागे वळून बघतो.
निकची अशी प्रतिक्रिया असणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच प्रकाशझोतात आला असून, सर्वच लोकं त्याच्या या प्रतिक्रियेवर कमेंट्स करताना दिसत आहे. यासोबतच व्हायरल होत असणाऱ्या एका व्हिडिओमध्ये निक प्रियांकाचा ड्रेस देखील नीट करताना दिसत असून, एका व्हिडिओमध्ये ते सोबत फोटोग्राफर्सला पोज देताना दिसत आहे. याशिवाय पोज देताना निक प्रेमाने निहाळताना देखील दिसत आहे.
या ब्रिटिश फॅशन पुरस्करांमध्ये प्रियांकाच्या हटके लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रियांकाने फ्लॉवर प्रिंट असलेल्या मल्टीकलरचा ड्रेस घातला असून, त्यावर न्यूड लिपस्टिक, गळ्यात सुंदर नेकपीस आणि केस वर बांधले आहे. तर लाल रंगाचा टिशर्ट आणि काळ्या रंगाचा कोट घातला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…
-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से