Thursday, April 18, 2024

लग्नाच्या 4 वर्षांनंतर रणवीर अन् दीपिकाचं बिनसलं? वेगळे होण्याच्या बातम्यांवर स्पष्टच बोलला ‘एनर्जी किंग’

बॉलिवूड कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आताही बॉलिवूडचे एक रोमँटिक जोडपे चर्चेचा विषय ठरत आहे. ते दुसरे-तिसरे कोणते नसून ‘एनर्जी किंग’ रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आहेत. या जोडीबद्दल अफवा असणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या सर्व बातम्या आता अभिनेता रणवीर सिंग याने फेटाळल्या आहेत. काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया…

खरं तर, अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्याबद्दल मागील काही दिवसांपूर्वी एक ट्वीट व्हायरल झाले होते. त्या ट्वीटमध्ये एका युजरने जोडप्याच्या नात्याविषयी असे लिहिले होते की, “ब्रेकिंग! #DeepikaPadukone आणि #RanveerSingh यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नाहीये.” हे ट्वीट इतके व्हायरल झाले होते की, रणवीर आणि दीपिकाचे चाहतेही हैराण होत चिंतेत पडले होते. आता या सर्व अफवांवर रणवीरने आपले मौन सोडले आहे. तसेच, त्याच्या चाहत्यांना खुश केले आहे.

रणवीरने ‘फिक्की फ्रेम्स फास्ट ट्रॅक 2022’ या कार्यक्रमादरम्यान दीपिका आणि त्याच्या नात्यावर स्पष्ट वाच्यता केली. या कार्यक्रमात जेव्हा त्याला ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला की, “आम्ही भेटलो, आणि 2012मध्ये डेटिंग सुरू केली. त्यामुळे 2022मध्ये मला आणि दीपिकाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.” या कार्यक्रमातील रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या नात्याविषयी बोलताना दिसत आहे. रणवीरच्या या वक्तव्याने चाहतेही खुश झाले आहेत.

हेही वाचा- ‘कॉफी विथ करण’मध्ये तापसी पन्नूला का बोलावले नाही? करण जोहरने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (Ranveer Singh And Deepika Padukone) हे बी-टाऊनमधील सर्वात आवडत्या जोडींपैकी एक आहेत. दोघांमधील खास बाँडिंग चाहत्यांना मजेशीर कपल गोल्स देत असतात. याव्यतिरिक्त दोघेही एकमेकांवर प्रेम आणि सन्मान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांनीही एकमेकांना डेट केल्यानंतर 2018मध्ये संसार थाटला होता. त्यांच्या लग्नाला 4 वर्षे झाले आहेत, तर त्यांच्या भेटीला आता 10 वर्षे पूर्ण झाले आहेत.

‘रामलीला’च्या सेटवर भेटलो होते रणवीर आणि दीपिका
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या सिनेमाच्या सेटवर भेटले होते. इथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. या सिनेमानंतर दोघेही ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani), ‘पद्मावत’ (Padmaavat) आणि ’83’ यांसारख्या सिनेमात एकत्र झळकले होते. या सर्व सिनेमांमधील त्यांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी या जोडीला डोक्यावर घेतले.

जोडप्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर रणवीर ‘सर्कस’, ‘रॉकी और राणी की कहाणी’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे, तर दीपिका ‘सर्कस’, ‘पठाण’, ‘फायटर’, ‘द इंटर्न’ यांसारख्या सिनेमात काम करताना दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दु:खद! ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायकाचे निधन, वयाच्या 59व्या वयात घेतला जगाचा निरोप
गुन्हा कबूल करणार की नवा डाव खेळणार? ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा थरारक टिझर आला समोर

हे देखील वाचा