बाबो! लँबोर्गिनीनंतर रणवीरने केली मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६०० कार खरेदी; किंमत वाचून डोळे होतील पांढरे


हिंदी सिनेसृष्टीमध्ये एनर्जीचे पावरहाऊस असणारा प्रभावी अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. खूप कमी कालावधीत त्याने त्याच्या अभिनयाने आणि दमदार डान्सने प्रेक्षकांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये जागा मिळवली. नुकताच रणवीरने ३६ वा वाढदिवस साजरा केला. याच निमित्ताने रणवीरने स्वतःला एक महागडे गिफ्ट दिले आहे.

त्याने त्याच्या या वाढदिवसानंतर स्वतःला हे महागडे गिफ्ट दिले आहे. रणवीर पुन्हा एकदा त्याच्या या कोट्यवधी किमतीच्या कारमुळे चर्चेत आलाय. रणवीरच्या या कारची किंमत ऐकून सर्वांचेच डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत.

रणवीरकडे आधीच कोट्यवधी किंमतीच्या अनेक आलिशान गाड्यांची लाईन आहे. २०१९ साली त्याने लँबोर्गिनी उरुस पर्ल कॅप्सूल एडिशन वर्जन ही कार घेतली होती. आज पुन्हा रणवीरच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एक मोठी गाडी सामील झाली आहे. त्याने जगातली महागडी कार खरेदी केली आहे. ‘मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६००’ ही महागडी कार रणवीरने त्याच्या वाढदिवसाला स्वतःलाच गिफ्ट केली आहे.

ही गाडी अगदी मागच्याच महिन्यात भारतात लाँच झाली आहे. या कारची किंमत तब्बल ३ कोटी इतकी आहे. भारतातील ही सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. या कारसोबतचा त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यात तो कारच्या बाजूला उभा असलेला दिसून येत आहे.

अभिनेत्याने नुकतीच घेतलेल्या मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६०० कारबद्दल सांगायचे झाले, तर ही कार स्टॅंडर्ड व्हर्जनच्या तुलनेत अनेक पटीने प्रीमियम आहे. या कारमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये वुडन इंसर्ट, नापा लेदर, 12.3 इंचचे डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, 12.3 इंचचे इन्फोटेनमेंट सिस्टम एमबीयूएक्स इंटरफेस सोबतच हॅंडरायटिंग रिकग्निशन आणि जेस्चर कंट्रोल, इलेक्ट्रिकली- ओपनिंग पॅनोरमिक स्लायडिंग आणि एक अपारदर्शी रोलर ब्लाइण्ड सोबत सनरूफ देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या कारमध्ये क्लायमेट कंट्रोलसोबतच मसाज फंक्शनदेखील देण्यात आले आहे.

रणवीरकडे १ कोटी ५० लाखांची रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस, ३ कोटी ३० लाखांची ऑस्टिन मार्टिन रॅपिड एस, २ कोटी १० लाखांची लँड रोवर रेंज रोवर वोग, १ कोटीची जॅग्वार XJL , ५६ लाखांची ऑडी क्यू-५, मारुती सियाज सिदान आदी अनेक लक्झरी गाड्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.