Thursday, July 18, 2024

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीरचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘कॅटरिना आणि दीपिका औकातीच्या बाहेरच्या’

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे त्यांच्या विनोदबुद्धीसाठी ओळखले जातात. त्यापैकीच एक म्हणजे रणवीर सिंग होय. रणवीर जिथेही जातो, तिथे तो सर्वांची मने जिंकून घेतो. त्याचा एनर्जेटिक डान्सदेखील प्रेक्षकांसाठी जणू पर्वणीच असतो. असाच काहीसा नजारा पाहायला मिळाला. मंगळवारी (दि. 30 ऑगस्ट) मुंबईत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यादरम्यान रणवीर या सोहळ्याची शान बनला. विशेष म्हणजे, त्याने यावेळी पत्नी दीपिका पदुकोण हिच्यावर प्रेम व्यक्त करण्याची संधी सोडली नाही.

‘दोघी आमच्या आवाक्याच्या बाहेरच्या’
रणवीर सिंग (Ranveer Singh) याने फिल्मफेअर पुरस्कार 2022 (Filmfare Awards 2022) सोहळ्यात स्वत:च्याच लग्नावर जोक मारला. त्याचा जोक ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. महत्त्वाचं म्हणजे, रणवीरने त्याच्या जोकमध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) यालाही ओढले. झाले असे की, रणवीर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत होता. त्यावेळी विकी आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांची ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर रणवीर म्हणाला की, विकीसाठी हे वर्ष चांगले गेले आहे. विकी आणि मी दोघेही आईचे लाडके आहोत. आम्ही दोघेही करण जोहरच्या ‘तख्त’ सिनेमात भाऊ बनणार होतो. शेवटी आम्ही दोघेही डार्क आणि हँडसम आहोत. दोघेही त्यांचे वैवाहिक आयुष्य जगत आहेत. लोक आम्हाला म्हणतात की, “त्या दोघीही आमच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत.”

आलियाच्या लग्नामुळे का आनंदी झाले रणवीरचे वडील?
रणवीर सिंग याचे हे भाष्य ऐकून उपस्थित पाहुणे जोरजोरात हसू लागले. या सोहळ्यात रणवीरने आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नावरही चर्चा केली. रणवीरने दावा केला की, त्याचे वडील या जोडप्याचे लग्न पाहून खूपच आनंंदी झाले होते. यामागील कारण सांगताना रणवीर म्हणाला की, “आलिया आणि रणबीर यांचे लग्न सर्वोत्तम होते. हे छोटेसे, इंटीमेट आणि कोजी होते. त्यांनी जेवणावर खूप सारा पैसा वाचवला आहे. माझे वडील त्यांच्या लग्नाबद्दल खूप आनंदी होते.” रणवीरच्या या वक्तव्यावरून समजते की, त्याने हा सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

रणवीर सिंग याला ’83’ या सिनेमातील शानदार कामगिरीसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. रणवीरला हा पुरस्कार खुद्द त्याची पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने दिला. रणवीर हा पुरस्कार जिंकल्याने एवढा खुश झाला की, त्याने दीपिकावरही प्रेमाचा वर्षाव केला. रणवीरने दीपिकाला सर्वांसमोर किसदेखील केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉपची जबाबदारी घेणार, आमिर खानने नाकारले मानधनाचे इतके कोटी
सलमान खानसोबत ‘ही’ अभिनेत्री होस्ट करणार बिग बॉस 16? नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकित
जे नव्हतं सांगायचं, तेच सांगून बसली शहनाज गिल; म्हणाली, ‘या’ व्यक्तीला सतत करते सोशल मीडियावर स्टॉक

हे देखील वाचा