Sunday, June 23, 2024

लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान रितेश देशमुखची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला, ‘प्रत्येक मत…’

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल पाहणे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे होते. आता महाराष्ट्रातील कल समोर यायला लागलेला आहे. लोकसभेच्या निकाल दरम्यान धक्कादायक असा कल समोर येत आहेत. महायुतीचे आव्हान मोडत आता अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारलेली आहे. तसेच काही उमेदवारांनी त्यांचा विजय देखील निश्चित केला आहे. अशातच आता अभियंता रितेश देशमुखची आजच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

रितेश देशमुखने एक्सवर पोस्ट करत निवडणुकीच्या निकालावर एका वाक्यात भाष्य केलेले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख आहेत.तो राजकारणात देखील सक्रिय असतो. त्याचप्रमाणे त्याचे 2 भाऊ देखील राजकारणात सक्रिय आहेत. दोघेही आमदार आहे.

रितेश देशमुखने एक्सवर पोस्ट करून ईव्हीएमवर भाष्य केलेले आहे त्याने म्हटले आहे की, “EVM = EVERYONE VOTE MATTER’ अशी प्रतिक्रिया समोर आलेली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर कमेंट देखील करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मथुरेत हेमा मालिनी यांची हॅट्रिक निश्चित, आतापर्यंत 2 लाख मतांनी आघाडीवर
शोनाली बोसच्या पुढच्या चित्रपटात राणी मुखर्जीची एन्ट्री? या महिन्यापासून शूटिंग सुरू करण्याची तयारी

हे देखील वाचा