सन 2022 या वर्षात साऊथ इंडस्ट्रीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. त्यापैकीच एक म्हणजे सप्टेंबरच्या अखेरीस रिलीज झालेला ‘कांतारा‘ होय. रिषभ शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमाच्या दुसऱ्या भागावर लवकरच काम सुरू होऊ शकते. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये. अशात माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘दैव नर्तका’ने या बातमीचा खुलासा केला आहे.
‘दैव नर्तक’ उमेश गंधकडू यांच्यानुसार, रिषभ शेट्टी (Rishab Shetty) याने ‘कांतारा’ (Kantara) सीक्वलसाठी परमेश्वराकडे परवानगी मागितली होती. तसेच, ‘स्थानिक देवताने परवानगीही दिली आहे.’
रिषभ शेट्टीने परमेश्वराकडे मागितली होती परवानगी
‘दैव नर्तक’ उमेश गंधकडू यांनी म्हटले की, “रिषभ शेट्टीने मंगळुरूमध्ये पंजुर्ली (एक स्थानिक देवता) सेवा करण्यासाठी आम्हाला सांगितले. मी बंदले येथील मदिवलबेट्टू मंदिरात सेवा केली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, ते अधिक माहिती देऊ शकत नाहीत, कारण जेव्हा ते ‘दैव नर्तक’ बनतात, तेव्हा हे स्थानिक देव बोलतात, ते नाही.
View this post on Instagram
जेव्हा गंधकडूंनी त्याच्या ‘दैव नर्तक’ रूपात विनंती केली, तेव्हा परमेश्वराने त्याला होकार दिला. देवाने अत्यंत काळजीपूर्वक सीक्वेल बनवण्याचा सल्ला दिला आणि मंदिराची निगा राखणारे, भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. वीरेंद्र हेगडे यांची भेट घेतली. त्यांनी रिषभ शेट्टीला भगवान अन्नप्पा पंजुर्लीसमोर प्रार्थना करण्यास सांगितले आहे.
लॉकडाऊनमध्ये सुचली होती सिनेमाची कल्पना
रिषभ शेट्टी कांतारा (Rishab Shetty Kantara) सिनेमामध्ये शिव या भूमिकेत आहे. त्याने म्हटले की, त्याला लहानपणापासूनच अशी भूमिका साकारण्याची आवड होती. तो म्हणाला, “‘कांतारा’चा विचार दुसऱ्या कोव्हिड लॉकडाऊनदरम्यान आला होता. तसेच, मी संपूर्ण सिनेमाची शूटिंग माझ्या गावात म्हणजेच कुंडापुरा, कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात केली होती.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, 90च्या दशकाच्या शेवटी प्रादेशिक सिनेमांचा प्रभाव पाश्चिमात्य सिनेमांवर पडला. मात्र, आज ते स्थानिक संस्कृतीला सामील करत आहेत. तसेच, विविधतेने त्यांना जीवंतपणा दिला आहे, जो प्रेक्षकांनीही स्वीकारला आहे.
‘कांतारा’ची कमाई
‘कांतारा’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर या सिनेमाचे दिग्दर्शन रिषभ शेट्टी याने केले आहे. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल 400 कोटींहून अधिक रुपयांची कमाई करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाबद्दल चर्चा सुरू झाल्यामुळे चाहत्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (actor rishab shetty reached the shelter of this local deity before starting work on kantara 2 got permission)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
आईची कुशी असेल, तर उशीची काय गरज! हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच प्रसिद्ध गायकाने आईसोबतचा फोटो केला शेअर
‘लोक आपला वेळ विसरतात…’, म्हणत यशपाल यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीवर व्यक्त केला संताप