Thursday, April 25, 2024

रिषभ शेट्टी नव्हे तर कांतारामधील शिवा ही भूमिका साकारणार होता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, पण आता…

रिषभ शेट्टी(Rishabh Shetty) याच्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच रिषभ शेट्टी यात मुख्य भूमिकेतही दिसला आहे. मात्र, अलीकडेच त्याने हा चित्रपट दक्षिणेतील लोकप्रिय दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार(Punit Rajkumar) हा या चित्रपटात शिवा ही भूमिका साकारणारची ऑफर केल्याचा खुलासा केला आहे.

ऋषभ शेट्टीने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की “मला नेहमीच शिवाची भूमिका करायची होती, परंतु या चित्रपटाची निर्मिती करण्याच्या काही महिन्यांपूर्वी मी या भूमिकेची ऑफर अभिनेता पुनीत राजकुमार यांना मी चित्रपटाचमी देखील सांगितली होती.

यामुळे चित्रपट करू शकलो नाही
रिषभने पुढे सांगितले की, ही गोष्ट ऐकल्यानंतर पुनीत राजकुमार खूप उत्साही झाला होता, पण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तो या चित्रपटात काम करू शकला नाही. ऋषभ म्हणाला, “एक दिवस त्याने मला फोन केला आणि सांगितले की, एकेदिवशी मला त्यांनी फोन केला आणि म्हणाले की हा चित्रपट तुम्ही माझ्याशिवाय करा कारण माझी वाट तुम्ही पाहिली तर यावर्षी तुम्ही हा चित्रपट करु शकणार नाहीत.’

पुनीत राजकुमारच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी ‘बजरंगी 2’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये त्याची भेट झाल्याचेही ऋषभ शेट्टीने यावेळी सांगितले. रिषभ म्हणाला, “त्यावेळी त्याने मला कांताराबद्दल विचारले होते, मी त्याला शूटचे काही फोटोही दाखवले, त्याने माझ्या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आणि ते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होता.” अभिनेता पुनीत राजकुमारचं 29 ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
थलैवानंतर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारममने ‘कांतारा’चे केले कौतुक, फोटो सोशल मीडियावर होताय व्हायरल…

‘मी जेव्हा तिच्या रूम…’;बोनी कपूर यांनी नॅशनल टेलिव्हिजनवर शेअर केलं जान्हवी कपूरचं बाथरूम सिक्रेट

हे देखील वाचा