Saturday, May 18, 2024

‘कांतारा’ चित्रपटाच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘जळफळाट’ तर रिषभ शेट्टीने दिले धमाकेदार उत्तर

दाक्षिणात्य सुपरस्टार रिषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा‘ चित्रपाटने दक्षिणच नाही तर पुर्ण भारतातील प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. या चित्रपाटाने तब्बल तीन महिने सनेमागृहामध्ये राज्य केले आहे. आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजुनच चित्रपटाचा आनंद लुटता येत आहे. नुकतंच हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडधील लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपली प्रतिक्रिया सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.

प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी  याने नुकतंच दिलेल्या मुलाखतीदरम्यान ‘कांतारा’ चित्रपटावर एक प्रश्न विचारला होता, तेव्हा अभिनेत्याने स्वाकारले की, त्याला रिषभच्या कामापासून जळन होत आहे. मुलाखतीदरम्यान रिपोटरने अभिनेत्याला विाचरले की, ‘काय तु रिषभच्या कामावर प्रभावी आहेस का?’ यावर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो की, हे तर स्वाभाविकच आहे, जर कोण चांगलं काम करत असेल तर, द्वेष निर्माण होणारच. त्यासोबतच प्रतिस्पर्धी देखिल…एवढे म्हणतच त्याला मधी अडवले आणि मध्येच दुसरा प्रश्न विचारला की, ‘तुझ्यामध्ये  द्वेष का निर्माण झाला?’ अभिनेता सांगतो की, “कारण तो इतकं चांगलं काम करतोय. हा असा (नकारात्मक) प्रकारचा जळफळाट नाही, परंतु तो तुम्हाला तुमच्या पायाच्या बोटांवर ठेवतो, अगदी मला देखिल कठोर परिश्रम करावे लागतील.”

यानंतर रिषभने आपल्या कामाचे कौतुक करत सांगितले की, “मी नवाज भाऊचे अनेक चित्रपट पाहिले आहेत आणि त्यांचा प्रवास कठोर आणि परिश्रमांनी भरलेला आहे. तो आमच्यासारखाच आहे, आम्ही कोणतीही पार्श्वभूमी नसलेले मध्यमवर्गीय लोकं आहोत. पण आम्हाला इंडस्ट्रीत येऊन काहीतरी मोठं करायचं आहे. तो एक प्रचंड प्रेरणा आहे. त्यांनी रंगभूमीवर येऊन अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत. आमचा मोठा ब्रेक मिळण्याआधी आम्ही कन्नड सिनेमातही अशा छोट्या भूमिका केल्या आहेत. ते आमचे ज्येष्ठ आहेत, आमचा एकच प्रवास आहे.” असे म्हणत रिषभ शेट्टीने नवाज उद्दीनचे कौतुक करत स्वत:चा आणि अभिनेत्याचा इंडसट्रीमधील प्रवास सारखाच असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच रिषभने नवाजला आपले ज्येष्ठ मानले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! असे काय घडले की, शाहीद समोर मीराने इशान खट्टरला मारली कानाखाली… कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
फायर है! ‘पठान’ चित्रपटीचं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा