जेव्हा ऋषी कपूर यांनी वाजवली होती रणबीरच्या कानाखाली; खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

दिवंगत अभिनेते-निर्माते ऋषी कपूर हे आपल्या कारकिर्दीत सर्वांचे लाडके अभिनेते होते. ऋषी यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांनी मुलगा, प्रियकर, पती आणि अगदी वडिलांच्या भूमिका मनापासून निभावल्या आहेत. यामुळेच त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत, पण चित्रपटसृष्टी आजही ४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या या महान कलाकाराची आठवण ठेवते. ते बॉलिवूडमध्ये एक उत्कृष्ट अभिनेते होते. तसेच कुटुंबाबाबतही तितकेच गंभीर होते, पण जगाला त्यांच्या रागाची जाणीव होती. एकदा रणबीर कपूरने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ऋषी कपूर यांनी रागाच्या भरात त्याला चापट मारली होती. अशी कोणती चूक रणबीरने केली होती, जी त्याच्या वडिलांना सहन होत नव्हती? जाणून घेऊया या लेखातून…

ऋषी कपूर संतापले
जे कोणी ऋषी कपूर यांना ओळखतात, त्यांनाही माहिती होते की, ऋषी यांना चुकीचे बोलणे सहन होत नाही. त्यांनी अनेकवेळा आपला राग माध्यमांसमोरही व्यक्त केला होता. एकदा एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला होता की, त्याच्या वडिलांनी त्याला जोरदार चापट मारली होती. (Actor Rishi Kapoor Slapped Ranbir Kapoor When He Was A Child)

रणबीर १२ वर्षांचा होता
जेव्हा रणबीर फक्त १२ वर्षांचा होता, तेव्हाची ही गोष्ट होती. वडील ऋषी कपूर यांनी एक दिवस त्यांच्या घरी पूजा ठेवली होती. घरातील सर्व लोक पूजेत सहभागी झाले होते. त्यानंतर रणबीरही पूजेला उपस्थित राहण्यासाठी पोहोचला. रणबीरला पाहून त्याचे वडील खूपच संतापले आणि रणबीरच्या गालावर जोरदार चापट मारली होती.

रणबीर घातले होते शूज
खरं तर, रणबीरला माहिती नव्हते की, पूजेला बूट घालून बसत नसतात. अशा परिस्थितीत तो बूट घालून पूजेला गेला. त्यावेळी ऋषी कपूर रणबीरला बूट घातलेले पाहून खूप भडकले. त्यानंतर, त्यांनी रणबीरला समजावून सांगितले की, पूजा किंवा मंदिरात बूट घालून जात नसतात.

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

वडील आणि मुलामध्ये जबरदस्त होते बाँडिंग
ऋषी कपूर अनेकदा आपल्या मुलाची स्तुती करायचे. २०१५ मध्ये एका मुलाखतीत रणबीरला चांगला मुलगा म्हटले होते. इतकेच नव्हे, तर ऋषी कपूर जेव्हा कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते, तेव्हाही रणबीरने क्षणभरही वडिलांची साथ सोडली नव्हती. परंतु ३० एप्रिल, २०२० रोजी उपचारादरम्यान ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

Latest Post