Monday, October 7, 2024
Home बॉलीवूड असं काय झालं की, रितेश देशमुख युजरला म्हणाला, ‘मी शाकाहारी आहे, दही खात नाही’

असं काय झालं की, रितेश देशमुख युजरला म्हणाला, ‘मी शाकाहारी आहे, दही खात नाही’

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये रितेश देशमुखचाही समावेश होतो. रितेश हल्ली आपल्या चित्रपटांऐवजी आपल्या सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओ आणि मजेशीर वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत आहे. अशातच त्याने ट्विटरवर केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे. त्याचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल.

खरं तर, रितेशने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सणांमध्ये मिठाईंचे भाव वाढण्याबाबत एख पोस्ट शेअर करत निशाणा साधला होता. यामध्ये लाडूचा भाव ४०० रुपये प्रति किलो, जलेबी ६०० रुपये प्रति किलो, काजू बर्फी ८०० रुपये प्रति किलो आणि चॉकलेट १००० रुपये प्रति किलो असे भाव लिहिले आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने शेवटी वजन कमी करणे १५००० रुपये प्रति किलो. सांभाळून निवडा, असे लिहिले. त्याच्या या पोस्टवर काही युजर्सनी अभिनेत्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तर त्यानेही त्याच्या मजेशीर अंदाजात केवळ उत्तर दिले नाही, तर हजरजबाबीपणाने अनेक चाहत्यांचे मनही जिंकले. (Actor Riteish Deshmukh Said That I Am A Vegetarian Do Not Eat Curd)

ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले होते की, “मी विचार केला की, तुम्हाला सावध करू.”

यावर एका युजरने ट्वीट रिट्विट करत विचारले की, “तुम्हा लोकांना फक्त सनातनी सणांवर ज्ञान आहे का? ईद किंवा मेरी ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही तोंडात दही जमा करता!” यावर रितेशने मजेशीर अंदाजात प्रत्युत्तर दिले.

रितेशने म्हटले की, “माफ करा सर. मी शाकाहारी आहे. दही खात नाही.” अभिनेत्याचे हे ट्वीट भन्नाट व्हायरल होत आहे.

यापूर्वी रितेशने म्हटले होते की, टिकटॉक ऍप बंद झाल्याने त्याला बेरोजगार झाल्यासारखे वाटत होते. मात्र, नंतर इंस्टाग्राम रील्सने त्याला आधार दिला.

रितेश शेवटचा ‘बाघी ३’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडेही होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझा या गोष्टींवर विश्वास नाही’, म्हणत रिया कपूरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा