‘बाबा आई आली’, रितेशने मुलांसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट


हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेला अभिनेता म्हणजे रितेश देशमुख होय. रितेश आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. तो फोटो, मजेशीर व्हिडिओ, तसेच आयुष्यातील विविध गोष्टीही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतो, त्याच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून कमालीची पसंती मिळते. अशातच आता त्याचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. जो पाहून तुम्हीही तुमचे हसू रोखू शकणार नाहीत.

रितेश आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडच्या गोड आणि रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. नेहमीच हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतेच रितेशने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलांसोबतचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Actor Riteish Deshmukh Shared Funny Video On Instagram With His Kids)

रितेशची कार घेऊन गेली जेनेलिया
अशातच रितेशने शेअर केलेल्या मजेशीर व्हिडिओत दिसते की, एक कार वेगाने मागून येत आहे आणि दुसऱ्या कारला टक्कर मारते. यानंतर खिडकीजवळ उभे असलेले रितेश- जेनेलियाचे दोन्हीही मुलं म्हणतात की, “बाबा आई आली.” खरं तर हा व्हिडिओत जो कार अपघाताची क्लिप आहे, ती कोणत्यातरी प्रसिद्ध व्हायरल व्हिडिओचा भाग आहे.

रितेशचे तुटले हृदय
व्हिडिओ इथेच संपत नाही. दोन्हीही मुलं रितेशकडे येऊन म्हणतात की, “आई तुमची कार घेऊन गेली होती.” हे ऐकताच स्क्रीनवर रितेशसाठी लिहिले जाते की, “ती माझी कार घेऊन गेली होती.” यानंतर रितेश आपल्या डोक्याला हात लावतो तसेच कार क्रॅशचा आवाज येतो आणि बॅकग्राऊंडला ‘ओम शांति ओम’मधील गाणे ‘जग सूना सूना लागे रे’ वाजू लागते. या मजेशीर व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दोन मुलांचे आहेत पालक
रितेश आणि जेनेलियाचे लग्न सन २०१२ मध्ये झाले होते. दोघेही आपल्या वैवाहिक जीवन खूपच आनंदाज जगत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे नाव रियान आणि राहिल आहे. हे दोघेही आपल्या आई- वडिलांसोबत अनेक व्हिडिओमध्ये दिसतात.

रितेश देशमुखचे चित्रपट
रितेश देशमुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच रितेश अखेरच्या वेळेस ‘बागी ३’मध्ये दिसला होता.

त्याचवेळी जेनेलियाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘तुझे मेरी कसम से’ या चित्रपटामधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. यानंतर तिने तेलुगू चित्रपटांमध्येही खूप ओळख मिळविली. बॉलिवूडमध्ये जेनेलियाने ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘मस्ती’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुझी-माझी जोडी जमली रे! घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा एकदा पडली प्रेमात; स्वत:च केले कबूल

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ


Leave A Reply

Your email address will not be published.