Tuesday, April 16, 2024

अभिनेत्री करीना कपूर आणि अनन्या पांडेच्या घरी पोहोचले मुंबई पोलिस, ‘हे’ कारण आले समोर

बॉलिवूड सिनेजगतातील कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळेच आपल्या आवडत्या कलाकारांच्या बंगल्याखाली त्यांची एक झलक पाहायला चाहते गर्दी करतात. अशा उत्साही चाहत्यांच्या अनेक बातम्या नेहमीच ऐकायला मिळत असतात. पण जर चाहत्यांऐवजी पोलिसांनीच या लोकप्रिय कलाकारांच्या घराखाली गर्दी केली तर काय होईल. असाच प्रकार अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अनन्या पांडेसोबत (Ananya Pandey) घडला आहे. नेमक काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

करिना कपूर आणि अनन्या पांडे या हिंदी चित्रपट जगतातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या दमदार अभिनयाने करिनाने बॉलिवूडची बेबो असा मानाचा किताब मिळवला आहे. तर अभिनेत्री अनन्या पांडेनेही अल्पावधीतच आपल्या अभिनयाची सिने जगतात छाप पाडली आहे. अलिकडेच करीना कपूर आणि अनन्या पांडेच्या घरी पोलिस आल्याची बातमी समोर आली आहे. हा व्हिडिओ विरल भयानीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये करीना आणि अनन्याच्या घरासमोर पोलिसांच्या गाड्यांचा ताफा उभा असलेला पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत विरल भयानीने यासंबंधीचा सविस्तर खुलासा केला आहे. ज्यामध्ये “करीना कपूर आणि अनन्या पांडेला मुंबई पोलिस एका कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आले होते. तुम्हाला काय वाटलंं?” असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण काही गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी “आम्हाला काय वाटलं ते तुम्हालाही माहित आहे,” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रींचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ज्यामध्ये करीनाचे ९.२ मिलीयन इतके फॉलोअर्स आहेत तर अनन्याचेही इंस्टाग्रामवर तब्बल २२.७ इतके फॉलोअर्स आहेत.

हे देखील वाचा