Wednesday, July 3, 2024

साऱ्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं, अन् पत्नीच्या शुभेच्छा दुसरीकडं; सैफच्या वाढदिवशी करीनाची हटके पोस्ट

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना बॉलिवूडमधील ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जाते. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी खूपच जास्त आवडते. हे दोघेही एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची संधी कधीच सोडत नाहीत. अशात सैफ मंगळवारी (दि. १६ ऑगस्ट) त्याचा ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसोबतच कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, या सर्वांमध्ये त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीनाने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले.

करीनाची लक्षवेधी पोस्ट
अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने पती सैफ अली खान (Saif Ali Khan) याला त्याच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “जगातील सर्वात चांगल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आयुष्याचा हा प्रवास सुखकर आणि सोपा बनवतो. देवा हा मला असाच हवा. हा फोटो याचा पुरावा आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे जान. मला हे सांगायचंय की, तुझे पाऊट हे माझ्यापेक्षाही खूप चांगला आहे. बरोबर ना मित्रांनो? बर्थडे बॉय सैफ.” करीनाच्या या पोस्टवर रितेश देशमुख, मलायका अरोरा यांसारख्या कलाकारांनीह कमेंट करत सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सन २०१२मध्ये थाटला होता संसार
करीना आणि सैफ यांनी १६ ऑक्टोबर, २०१२मध्ये संसार थाटला होता. त्यांनी लग्नाच्या ४ वर्षांनंतर २०१६मध्ये पहिला मुलगा तैमूर अली खानला जन्म दिला. त्यानंतर फेब्रुवारी २०२१मध्ये त्यांनी दुसरा मुलगा जेहला जन्म दिला. त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलेही माध्यमांमध्ये झळकत असतात. तैमूरच्या जन्मानंतर माध्यमांमध्ये त्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता.

करीनाचे डिजिटल पदार्पण
करीना कपूर ही ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकली होती. या सिनेमात तिच्यासोबत आमिर खान दिसला होता. आता करीना तिच्या डिजिटल पदार्पणासाठीही सज्ज झाली आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित एका ओटीटी प्रोजेक्टमध्ये ती दिसणार आहे. दुसरीकडे, अभिनेता सैफ अली खान हा ‘विक्रम वेधा’ या थ्रिलर सिनेमात ऋतिक रोशन याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! बिपाशाने फोटो शेअर करत एकदाचं सांगूनच टाकलं, पाहून तुम्हीही व्हाल खुश
‘या’ आहेत हिट सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी, महेश बाबूच्या पत्नीसोबत होतं अफेअर?
सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या मांजरेकरांनी उराशी बाळगलेलं ‘हे’ स्वप्न, पण अभिनयाने मिळवून दिली ओळख

हे देखील वाचा