Friday, April 26, 2024

दु:खद! कार्टुनिस्ट आणि प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वात पसरली शोककळा

अभिनय क्षेत्रामधून नुकतंच एक दु:खद बातमी समोर येत आहे.त्रिशूर: चित्रपट आणि माहितीपट दिग्दर्शक आणि मानवाधिकार कार्यकर्ते केपी शशि यांचे रविवार (दि, 25 डिसेंबर) रोजी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षी रुग्नालयात अखेरचा श्वास घेतला. केरळच्या चित्रपट महासंघाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन निर्मात्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळेचे वातावरण पसरले आहे.

लघु चित्रपट निर्माता के. पी शशि (K.P. Sasi) यांनी खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. केपी शशि यांनी 1970 दशकामध्ये त्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यालायतून शिक्षणावेळी आपल्या आर्टिस्ट करिअरची सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी कार्टुनिस्ट म्हणून काम केले. मग हळू हळू त्यांनी डॉक्युमेंट्री आणि चित्रपटाचे निर्मिती करण्यास साक्षर झाले.

केपी शशि हे चित्रपट निर्मातासोबतच मानवअधिकारी कार्यकर्ता देखिल होते. 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘इलयुम मुल्लम’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. केरळमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठीही ते लोकप्रिय आहेत… माध्यामातील वृत्तानुसार केपी शशि यांचे (दि, 26 डिसेंबर) रोजी अंतिम संसंकार होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मृणालच्या दिलखुलास अंदाजावर चाहते झाले फिदा, पाहाच व्हायरल फोटो

नाताळच्या अभिजित अन् सुखदाने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा, पाहा फाेटो

हे देखील वाचा