Saturday, June 15, 2024

‘बियॉन्ड द स्टार’ डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये पाहायला मिळेल सलमानचा प्रवास, कधीही न ऐकलेल्या किस्स्यांचाही होणार खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) आयुष्यावर आणि कारकिर्दीवर बनवल्या जाणार्‍या ‘बियॉन्ड द स्टार’ या डॉक्युमेंटरी सीरिजमध्ये तो त्याच्या आयुष्याची एक मजेदार गोष्ट प्रामाणिकपणे मांडणार आहे. या सीरिजमध्ये ५५ वर्षीय अभिनेत्याचा प्रवास, त्याचे सुपरस्टारडम आणि चित्रपटसृष्टीतील लोकांसोबतचे त्याचे वाद, त्याचे कुटुंब, मित्र, सहकलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यातील समीकरणे आणि इतर गोष्टींचे वर्णन केले जाईल.

सलमानने सांगितले की, त्याची मैत्रीण रोमानियन अभिनेत्री, मॉडेल यूलिया वंतूर हिने डॉक्युमेंट्री सीरिजची कल्पना मांडली होती. यामध्ये त्याचा ३३ वर्षांचा चित्रपट प्रवास सांगितला जाणार असल्याचे त्याने सांगितले आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “माझी डॉक्यूमेंट्री सीरिज ‘बियॉन्ड द स्टार’ आहे आणि मलाही ती एक चांगली संकल्पना वाटली. मी ज्यांच्यासोबत काम केले आहे, कर्मचारी, मित्र, सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते सर्वजण मी आधी कसा होतो आणि आता कसा आहे याबद्दल बोलतील.”

सलमानने सांगितले की, “यूलियाने आंद्रेला (टिमन्स, विझ फिल्म्स)याबद्दल सांगितले आणि त्यांनी ते ऍप्लॉज एंटरटेनमेंटकडे नेले. मगत्यांनी या संकल्पनेला अंतिम रूप दिले. हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे.” विराफ सरकार दिग्दर्शित, डॉक्युमेंटरी त्या सर्व लोकांबद्दल सांगेल ज्यांनी सलमानला एक चांगला अभिनेता बनण्यास मदत केली.

‘अंतिम द फायनल ट्रुथ’च्या प्रमोशनमध्ये आहे व्यस्त
सध्या सलमान त्याच्या ‘अंतिम द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून, प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. महिमा मकवानाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खान यशराज चित्रपट ‘टायगर’ सीरिजच्या तिसऱ्या भागावर काम करत आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत कॅटरिना कैफही दिसणार आहे. अभिनेत्याने पुष्टी केली की, तो भारतीय एजंट रवींद्र कौशिकची भूमिका देखील साकारणार आहे, ज्यामध्ये तो त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांच्यासोबत सह-निर्मिती करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा