Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड ‘रिक्षावाला भाईजान’, पनवेलच्या रस्त्यावर सलमानने चालवली रिक्षा, चाहत्यांनी बनवला व्हिडिओ

‘रिक्षावाला भाईजान’, पनवेलच्या रस्त्यावर सलमानने चालवली रिक्षा, चाहत्यांनी बनवला व्हिडिओ

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) त्याच्या अभिनयासाठी आणि त्याच्या हटके अंदाजसाठी ओळखला जातो. तो सतत काही ना काही करून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. चाहत्यांमध्ये जायला आणि त्यांच्यात मिक्स व्हायला तो कधीच मागेपुढे पाहत नाही. आता भाईजानचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चाहत्यांना चकित केले आहे.

रिक्षा चालवताना दिसला सलमान खान
सध्या सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पनवेलमध्ये रिक्षा चालवताना दिसत आहे. ५६व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलमध्ये आराम करत असलेल्या सलमानचा हा अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये सलमान पनवेलच्या रस्त्यावर चक्क रिक्षा चालवताना दिसत आहे. रिक्षात सलमान असल्याचे समजताच चाहते उत्सुक झाले आणि मोबाईल काढून व्हिडिओ बनवू लागले.

व्हिडिओमध्ये लोक सलमानच्या रिक्षात बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दबंग खान कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. निळ्या रंगाचा टी-शर्ट-शॉर्ट घातलेल्या सलमानने टोपीही घातली आहे. इतका हँडसम रिक्षाचालक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.

सलमान गेल्या आठवड्यात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहोचला होता. वाढदिवसानंतरही सलमान पनवेलमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे. त्याच्या वाढदिवसाआधी एक मोठा अपघातही झाला. दबंग खानला त्याच्याच पनवेल फार्म हाऊसमध्ये साप चावला होता. सलमानला एकदा दोनदा नव्हे, तीनदा साप चावला. यानंतर भाईजानला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलमान खानला काही तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बरे झाल्यानंतर अभिनेत्याने आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला.

सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून, त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नुकताच काही दिवसांपूर्वी सलमानचा ‘अंतिम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो मराठीतील ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. सलमान सध्या ‘बिग बॉस १५’ पोस्ट करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा