फार्महाऊसपासून प्रायव्हेट योर्टपर्यंत, सलमान खान आहे ‘या’ लक्झरी वस्तूंचा मालक, पाहा यादी


बॉलिवूडविश्वात ‘दबंग’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खान ज्याने या इंडस्ट्रीला अगणित हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चाहत्यांच्या नजरेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने सहायक भूमिका केली होती. मात्र ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून सलमानने सर्वांनाच वेड लावले. गेली अनेक वर्षे मेहनत करून सलमानने स्वतःला बॉलिवूडचा ‘भाईजान’ बनवले आहे.

सलमान खानच्या लक्झरी वस्तू

गेल्या काही वर्षांत सलमानने ( Salman Khan) अमाप संपत्तीही कमावली आहे. ज्यातून तो लक्झरी लाईफस्टाईल जगतो. चला तर मग सलमानच्या त्या महागड्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलची झलक आहे. या गोष्टींमध्ये सलमानच्या फार्महाऊसपासून ते महागड्या सायकली आहेत, ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

फार्महाऊस

सलमानचे फार्महाऊस खूप लोकप्रिय आहे. मोकळ्या वेळेत तो अनेकदा तेथे जातो. त्याचे फार्महाऊस पनवेल, महाराष्ट्र येथे आहे. जे १५० एकरमध्ये पसरलेले आहे. या फार्महाऊसची किंमत १०० कोटी रुपये आहे. सलमानचे हे फार्महाऊस त्याची बहीण अर्पिताच्या नावावर आहे.

महागडी सायकल

सलमानला सायकल चालवण्याची खूप आवड आहे आणि याच कारणामुळे तो अनेकदा पहाटे मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसतो. सलमानकडे जगातील सर्वात महागडी सायकल Giant Propel 2014 XTC आहे. या सायकलची किंमत ३२ लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे.

बाईक आणि कार कलेक्शन

सलमानकडे महागड्या बाईक्सचेही मोठे कलेक्शन आहे. त्याच्याकडे Suzuki Hayabusa, Suzuki GSX-R1000 Z आणि Suzuki Intruder M1800 RZ सारख्या उत्तम बाइक्स आहेत. या सर्व बाइक्सची किंमत लाखोंमध्ये आहे. सलमान खानकडे महागड्या सायकल आणि बाईक व्यतिरिक्त गाड्या देखील आहेत. त्याच्याकडे Audi R8, Toyota Land Cruiser आणि BMW X6 सारखी वाहने आहेत. त्याच्या गाड्या कोट्यवधींच्या आहेत.

लक्झरी योर्ट 

फार कमी लोकांना माहित असेल की, सलमान खानने स्वतःला एक खाजगी याट गिफ्टमध्ये दिली होती. त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्याने ही योर्ट खरेदी केली आहे. तो त्याच्या मोकळ्या वेळेत या योर्टमध्ये जातो. तो येथे मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवतो.

हेही वाचा :

शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय

सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटासाठी ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

ट्विटरवर ‘अतरंगी रे’ विरोधात मोहीम, अक्षय-सारा अन् धनुषच्या चित्रपटावर ‘या’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप


Latest Post

error: Content is protected !!