Sunday, May 19, 2024

‘त्या दिवशी माझ्या करिअरचा द एंड होईल…’, सलमानने 1990मध्ये लिहिलेलं खुलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

तब्बल 34 वर्षांपूर्वी म्हणजेच 1988 मध्ये सुपरस्टार सलमान खान याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. मात्र,  ‘बीवी हो तो ऐसी’ या पहिल्या सिनेमात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1989 रोजी रिलीज झालेल्या ‘मैंने प्यार किया‘ या सिनेमातून सलमान मुख्य भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकला. यानंतर तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. त्याला आता इंडस्ट्रीत तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे. अशात त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मात्र, सुपरहिट झालेल्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमाच्या यशाचे श्रेय कथितरीत्या भाग्यश्रीला गेले. या सिनेमानंतर सलमान सहा महिने घरी बसून होता, त्यावेळी त्याने चाहत्यांसाठी एक खुलं पत्र लिहिले होते, जे आता व्हायरल होत आहे.

या पत्रात सलमान खान (Salman Khan) याने चाहत्यांना मनापासून धन्यवाद दिला होता. सलमानने 1990मध्ये लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमानचे हे पत्र एका युजरने ट्विटरवर शेअर केले आहे. या पत्रातून सलमानच्या भावना स्पष्ट होत आहेत.

काय होते पत्रात?
सलमान खान याने त्याच्या पत्रात लिहिले होते की, “मित्रांनो, मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचे आहे. सर्वप्रथम तुम्ही माझे चाहते आहात, त्यामुळे तुमचे धन्यवाद. मी चांगल्या स्क्रिप्टवर काम करत आहे आणि माझ्याकडून चांगल्या स्क्रिप्ट सिलेक्शनवरही मेहनत घेत आहे. कारण, मला माहिती आहे की, मी जे काही काम करेल, त्याची तुलना ‘मैंने प्यार किया’शी केली जाईल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही माझ्या नवीन सिनेमाची घोषणा ऐकाल, विश्वास ठेवा की, तो एक चांगला सिनेमा असेल आणि मी यामध्ये माझे 100 टक्के योगदान देईल.”

सलमान खान पत्रात (Salman Khan Letter) पुढे लिहिले होते की, “मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो. मी आशा करतो की, तुम्हीही माझ्यावर असेच प्रेम करत राहाल. ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर प्रेम करणे बंद कराल, त्या दिवशी तुम्हाला माझे सिनेमे दिसणे बंद होईल आणि तोच माझ्या कारकीर्दीचा शेवट असेल. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर मला जास्त काही सांगण्याची गरज नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहे. लोक म्हणतात की, मी माझी ओळख बनवली आहे, पण मला असे वाटत नाही. अजूनही तो पल्ला गाठायचा आहे. मात्र, मला एक गोष्ट माहिती आहे की, तुम्ही मला स्वीकारले आहे.”

सलमान खान याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘किक 2’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ यांसारख्या सिनेमात दिसणार आहे. (actor salman khan open letter written in 1990 goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ईशा गुप्ताने शेअर केला बेडरूममधील ‘तसला’ फोटो, चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल; कमेंट्स वाचाच
कातिलाना अंदाज! प्रसिद्ध अभिनेत्रीने बिकिनी घालून समुद्रकिनारी लचकवली कंबर, बोल्ड व्हिडिओ करेल घायाळ

हे देखील वाचा