Wednesday, December 6, 2023

सलमानने एक्स गर्लफ्रेंडसाेबत केले ‘हे’ विस्मयकारक कृत्य, एकदा व्हिडिओ पाहाच

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान मंगळवारी (दि. 27 डिसेंबर)ला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बी-टाऊनचे स्टार्स पोहोचले हाेते. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानही सलमानला त्याच्या वाढदिवशी सरप्राईज देण्यासाठी पोहोचला, जिथे दोघांमध्ये अप्रतिम बाँडिंग पाहायला मिळाले. याशिवाय संगीता बिजलानीही पार्टीत दिसल्या, ज्याचे व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहेत.

सलमान खानने (salman khan) त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सिक्योरिटीसाेबत ग्रँड एन्ट्री घेतली, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहेत. सलमान दरवर्षी पनवेलच्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करताे, मात्र यावेळी त्याच्या बर्थडे पार्टीचे आयाेजन बहीण अर्पिता खानच्या घरी करण्यात आले होते. भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुनील शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, तब्बू, युलिया वंतूर, अरबाज खान, रितेश देशमुख, कार्तिक आर्यन, जेनेलिया डिसूझा, तब्बू, पूजा हेगडे, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक स्टार्स पार्टीला उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरुख खान पार्टीत उशिरा पोहोचला, पण त्याची एंट्री एकदम शानदार होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खानने सलमान खानला मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ब्लॅक लूकमध्ये शाहरुख आणि सलमान खूपच हँडसम दिसत हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशातच संगीता बिजलानी पार्टीत पोहोचल्यावर सलमानने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. ब्लू शिमर ड्रेसमध्ये संगीता खूपच सुंदर दिसत हाेती. एकेकाळी सलमान खान आणि संगीता एकमेकांना डेट करायचे. मात्र, अनेक वर्षे डेट केल्यानंतर हे नाते तुटले. रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या हाेत्या, पण सलमानने सोमी अलीशी जवळीक वाढवल्यानंतर संगीताने नाते तोडले.(bollywood actor salman khan birthday bash shah rukh khan wish dabangg khan and actor kissed on forehead of sangeeta bijlani)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! सलमानच्या वाढदिवशी त्याची एक झलक पाहण्यासाठी बेकाबू झाली गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबावर काढला राग; म्हणाले, ‘सर्वात मोठे दोषी मुलींचे…’

हे देखील वाचा