Friday, March 29, 2024

कातिलाना अंदाज! प्रसिद्ध अभिनेत्रीने बिकिनी घालून समुद्रकिनारी लचकवली कंबर, बोल्ड व्हिडिओ करेल घायाळ

बेशरम रंग‘ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून एकच गदारोळ माजला. अनेकांनी या सिनेमावर टीकास्त्र डागले. असे असले, तरीही कलाकार मोठ्या संख्येने या गाण्यावर व्हिडिओ बनवत आहेत. यामध्ये भोजपुरी अभिनेत्री पूनम दुबे हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. पूनम तिच्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधत असते. अशात तिचा ‘बेशरम रंग’ गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिची कंबर लचकवताना दिसत आहे.

पूनम दुबेचा व्हिडिओ
पूनम दुबे (Poonam Dubey) हिने बिकिनी परिधान करत समुद्र किनारी ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) गाण्यावर बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. ती या व्हिडिओत काळ्या रंगाच्या बिकिनीत बोल्ड अदा दाखवत आहे. पूनमचा बोल्ड व्हिडिओ (Poonam Dubey Bold Dance) इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, नेटकरीही या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये गाण्याचे सुरुवातीचे बोल लिहिले आहेत. तिने लिहिले आहे की, “बेशरम रंग कहा देखा होगा दुनिया वालों ने.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Dubey (@poonamdubeyofficial)

या व्हिडिओवर 13 हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, शेकडो कमेंट्सचा पाऊसही पडला आहे. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “तुम्ही जेव्हा दाखवाल, तेव्हाच पाहणार ना.” दुसऱ्या एकाने असे लिहिले की, “बेशरमी आणि हॉटनेस ओव्हरलोड.” आणखी एकाने लिहिले की, “तुमचा तर जलवा आहे दीदी.” एक जण कमेंट करत म्हणाला की, “कातिलाना अंदाज.”

काय आहे ‘बेशरम रंग’चा वाद?
‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीजपासूनच चर्चेत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची अजूनही चर्चा सुरूच आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाच्या बिकिनी परिधान केली होती, त्यामुळे भावना दुखावल्याचाही आरोप लावण्यात आला. काहींनी निर्मात्यांकडे या गाण्याला सिनेमातून काढण्याची मागणी केली आहे. आता 25 जानेवारी, 2023 रोजी सिनेमा रिलीज झाल्यानंतर सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (bhojpuri actress poonam dubey bold dance on besharam rang sensuous video deepika padukone pathan controvercy)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका शेर, तर किली पॉलची बहीण सव्वाशेर! ‘बेशरम रंग’ गाण्यावरील नीमाच्या डान्सची नेटकऱ्यांनाही भुरळ
सलमानने एक्स गर्लफ्रेंडसाेबत केले ‘हे’ विस्मयकारक कृत्य, एकदा व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा